इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; विधेयकाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:47 AM2018-09-03T05:47:30+5:302018-09-03T05:47:50+5:30
राज्यातील विशेषत: मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क दुरुस्ती विधेयकासह (एमएओबी) एकूण तीन विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली : राज्यातील विशेषत: मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क दुरुस्ती विधेयकासह (एमएओबी) एकूण तीन विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
त्यामध्ये गुजरात कमाल शेतकी जमीनधारणा दुरुस्ती विधेयक २०१५, गुजरात कमाल शेतकी जमीनधारणा दुरुस्ती विधेयक २०१७ या दोन विधेयकांचाही समावेश आहे. महाराष्ट्र सदनिका मालकी हक्कासंदर्भातील आधीच्या कायद्यानुसार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतील सर्वच्या सर्व सदनिकाधारकांची संमती असल्याशिवाय त्या इमारतीचा पुनर्विकास करता येत नसे.
पण आता त्या इमारतीतील ५१ टक्के सदनिकाधारकांनी पुनर्विकासाच्या बाजूने कौल दिला, तर त्या प्रक्रियेला परवानगी देण्याची दुरुस्ती या कायद्यात करण्यात आली आहे.