फ्रीडम 251 मोबाईल 28 जूनपासून उपलब्ध होणार- रिंगिंग बेल
By admin | Published: June 14, 2016 06:50 PM2016-06-14T18:50:06+5:302016-06-14T19:16:07+5:30
251 रुपयांमध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल कंपनी वादाच्या भोव-यात सापडली होती.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - काही दिवसांपूर्वी 251 रुपयांमध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल कंपनी वादाच्या भोव-यात सापडली होती. कालांतरानं त्यांनी या फोनची बुकिंगही बंद केली होती. मात्र आता या 251 रुपयांच्या स्मार्ट फोनची डिलिव्हरी 28 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती रिंगिंग बेल या कंपनीनं दिली आहे. ज्या ग्राहकांनी हा फोन ऑनलाइन विकत घेतला आहे. त्यांना त्या फोनची डिलिव्हरी 28 जूनला मिळणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
रिंगिग बेल ही नायडास्थित कंपनी आहे. या फोन आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी या सुविधेवर देणार असल्याची माहिती रिंगिंग बेल कंपनीचे संचालक मोहीत गोयल यांनी दिली आहे. स्मार्ट फोन फ्रीडम 251 हा मोबाईल लाँच झाला होता. तेव्हा ग्राहकांच्या त्यांच्यावर उड्या पडल्या होत्या. मात्र काही काळानं या फोनची डिलिव्हरी बंद करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये रिंगिंग बेल कंपनीनं वेबसाइटच्या माध्यमातून या फोनची विक्री सुरू केली होती. मात्र हा स्मार्ट फोन जगातील सर्वात स्वस्त असल्यानं वादात सापडला होता. काहींच्या मते ही पाँझी योजना असल्याचंही वाटत होतं. या वेबसाइटलाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.
30 हजारांहून अधिक ग्राहकांनी हा फोन बुक केल्यानं डिलिव्हरीसाठी ग्राहकांना अडचणी येत होत्या. 7 हजारांहून अधिक ग्राहकांनी या फोनसाठी रजिस्ट्रार केलं होतं. या फोनच्या उत्पादनाला 2500 रुपये खर्च येत असल्याचीही माहितीही रिंगिंग बेल कंपनीचे संस्थापक अशोक चड्डा यांनी दिली आहे.