RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:43 PM2021-07-06T21:43:04+5:302021-07-06T21:43:55+5:30

फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

French company PathStore RT PCR testing in India just 299 rupees | RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

googlenewsNext

RT-PCR testing: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना आता पुन्हा एकदा व्यवहार हळूहळू रुळावर येत आहेत. सध्या कामकाजाच्या ठिकाणी कोरोनाची RT-PCR चाचणीचा निगेटीव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यातच फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही कंपनी संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. सध्या गुरूग्राम येथे कंपनीनं आरटीपीसीआर आणि जैव सुरक्षा स्तराची चाचणी करणारी लॅब उभारली आहे. यात एका दिवसात १ लाख नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता आहे. स्वस्तात आरटीपीसीआर चाचणी होणार असल्यानं याचा पर्यटन, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रात खूप मोठी मदत मिळणार आहे. 

"समाजातील आर्थिकरित्या कमकुवत गटाला कोरोना चाचणी स्वस्तात उपलब्ध झाल्यानं मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात देशातील सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये विविध ठिकाणी कंपनीकडून स्वस्तात आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. यात कंपनीकडून आरटीपीसीआर चाचणीसाठीचे नमुने जमा करण्यासाठी २ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे", अशी माहिती पाथस्टोअर कंपनीची मूळ कंपनी असणाऱ्या GeneStore चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुभव अनुषा यांनी दिली. 

RT-PCR चाचणी सर्वात अचूक चाचणी
कोरोना व्हायरसची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी सध्या दोन चाचण्यांचा पर्याय उपलब्ध आहे. यात आरटीपीसीआर आणि दुसरा पर्याय रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) उपलब्ध आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या रुग्णांला कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित करण्यात येतं. पण रॅपिड अँटिजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणी अधिक अचूक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीला सर्वाधिक महत्व आहे. 

Web Title: French company PathStore RT PCR testing in India just 299 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.