स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सची गुंतवणूक

By admin | Published: November 5, 2015 02:45 AM2015-11-05T02:45:48+5:302015-11-05T02:45:48+5:30

फ्रान्सने भारतातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात दोन अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे ठरविले असून विशेष लक्ष दिल्या जाणाऱ्या शहरांमध्ये नागपूरसह चंदीगड, पुडुचेरीसारख्या शहरांचा समावेश

French investment for Smart City | स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सची गुंतवणूक

स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सची गुंतवणूक

Next

नवी दिल्ली : फ्रान्सने भारतातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात दोन अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे ठरविले असून विशेष लक्ष दिल्या जाणाऱ्या शहरांमध्ये नागपूरसह चंदीगड, पुडुचेरीसारख्या शहरांचा समावेश असेल, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत फ्रॅन्कोईस रिचियर यांनी स्पष्ट केले आहे.
बेंगळुरू मेट्रोच्या विस्तारासाठीही ही कंपनी २० कोटी अमेरिकन युरोची गुंतवणूक करणार आहे. फिक्की, फ्रान्स दूतावास आणि नगरविकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘टूवर्ड स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटीज’ या परिसंवादात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये भेट दिली त्यावेळी फ्रान्सने भारतातील स्मार्ट सिटी तसेच ऊर्जा नूतनीकरणासारख्या प्रकल्पात ६० कोटी युरोची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. स्मार्ट सिटी विकसित करण्यासह भारतातील पर्यटन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासही हा देश उत्सुक आहे.

Web Title: French investment for Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.