चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टला मित्रांनी बांधला दोरा, न्यावं लागलं हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर…
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:36 PM2022-12-31T14:36:14+5:302022-12-31T14:36:36+5:30
Delhi News: दिल्लीतील एका सरकारी शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये मुलांनी एका आठ वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोऱ्याने बांधले. त्यामुळे या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिल्लीतील एका सरकारी शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये मुलांनी एका आठ वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोऱ्याने बांधले. त्यामुळे या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र पीडित मुलगा हे कृत्य करणाऱ्या मुलांची ओळख पटवू शकत नाही आहे.
दिल्लीतील किडवईनगर परिसरामध्ये नवी दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने एका आठ वर्षीय मुलाच्या गुप्तांगाला नायलॉनचा दोरा गुंडाळला. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्याला देखभालीखाली ठेवण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थी हा किडवईनगर येथील अटल आदर्श स्कूलमध्ये शिकत आहे. या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टला काही सहकारी विद्यार्थ्यांनी नायलॉनचा धागा बांधला. हा विद्यार्थी २८ डिसेंबर रोजी घरी आंघोळ करत असताना या प्रकाराचा उलगडा झाला.
त्यानंतर या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथूनच पोलिसांना फोन केला गेला. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी मुलावरील उपचार आणि स्थितीची पाहणी करण्यासाठी रुग्णालयाल भेट दिली आहे. तिथे त्यांना डॉक्टरांनी मुलाची प्रकृती स्थित असल्याचे आणि त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे सांगितले. मिळत असलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा हे कृत्य करणाऱ्या मुलांना ओळखू शकलेला नाही. तसेच मुलांची ओळख पटवण्यासाठी पोलीस आता शाळेचा दौरा करणार आहेत.