शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:41 AM2023-11-24T05:41:19+5:302023-11-24T05:42:13+5:30
हमीभावासाठी ठिय्या मारल्याने अनेक रेल्वे गाड्या विस्कळीत
चंडीगड : उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. तीन दिवसांपासून महामार्ग रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता जालंधरमध्ये रेल्वे रुळावरही ठिय्या मारला आहे. बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांची बैठक होऊ न शकल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. मोठ्या संख्येने तैनात पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दररोज १२० गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. आज आंदोलनापूर्वी ४० गाड्या रवाना झाल्या होत्या, मात्र नंतर ८० गाड्यांवर परिणाम झाला आहे. या ८० गाड्या वळवण्याचा रेल्वेचा विचार आहे. आंदोलन सुरू होताच शताब्दी एक्स्प्रेस कपूरथला जिल्ह्यातील फगवाडा येथे थांबवण्यात आली.
दिल्ली-जम्मू महामार्ग तीन दिवस पूर्णपणे बंद
nजालंधरमधील धन्नो वाली फाटकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्ली-जम्मू महामार्ग पूर्णपणे बंद आहे.
nराष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तंबू ठोकला असून, बाजूची सर्व्हिस लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
nआता त्यांनी लुधियानाच्या धन्नो वाली फाटकाजवळ रेल्वे रुळावर ठाण मांडले आहे.