कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:36 AM2023-05-04T08:36:29+5:302023-05-04T09:24:55+5:30

Chawal Wale Baba: सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात.

From kanyadana to miracles, fortune telling in a handful of rice, now Chawalwale Baba is in the news | कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

googlenewsNext

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात. ते रनपेटा गावामध्ये भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत. भागवत कथेबरोबरच ते लोकांचे भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगतात. त्यांच्या दरबारात लोक मुठभर तांदूळ घेऊन येतात. त्याच तांदळापासून भागवताचार्य शास्त्री लोकांची कुंडली तयार करतात. ते माता भगवती आणि ठाकूरजी यांना आराध्य मानतात. जेव्हा भविष्य सांगायचं असेल तेव्हा ते त्यांच्या मनातून त्यांच्या आराध्यांचं स्मरण करतात. मग चमत्कार घडतो, असे शास्त्री सांगतात.

कुंडली तयार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख किंवा नाव जाणून घेण्याची गरज नाही. एक मुठभर तांदूळ वापरून पूर्ण कुंडली तयार होते. त्यांचं नाव काय आहे. कुठे जन्म झाला.  कुठल्या तारखेला जन्म झाला. त्याला काय त्रास आहेत. सर्व काही समोर येते. त्याच आधारावर त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं.

बाबांच्या दरबारातून भुतकाळ आणि भविष्यकाळाबाबत जाणून घेतल्यावर बाहेर आलेल्या लोकांना आत बसलेल्या बाबांनी मुठभर तांदूळ पाहून भविष्य सांगितलं का, त्यात किती सत्यता आहे, तुम्ही त्यावर किती समाधानी आहात? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता लोकांनी बाबांना आधीपासूनच सारं काही माहिती असतं. त्यांच्या आशीर्वादाने समस्यांचं निराकरण होतं, असं सांगितलं.

आचार्य शास्त्री हे त्यांच्या चमत्कार आणि सिद्धीसाठी ओळखले जातात. सोबतच कुठेही पूजा भागवत कथा यातून जी काही दक्षिणा, वस्तू मिळतात, त्या ते गावातील गरीब मुलींना दान करतात. तिथून ते आपल्यासोबत काही आणत नाहीत. आतापर्यंत त्यांनी २८६ गरीब मुलींच्या विवाहासाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम कन्यादान म्हणून खर्च केली आहे. तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कन्यादान करत राहीन, असं ते सांगतात.

दरम्यान, बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते आध्यात्म आणि सनातनसाठी जे काही करत आहेत, ते कौतुकास्पद असल्याचे  आचार्य शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आणि आमचा दरबार यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दरबारात भूत प्रेत आदि बाधांशिवाय काही दिसत नाही. तर आमच्या दरबारात कुठलाही तंत्र किंवा मंत्र केला जात नाही. जे काही होतं ते ठाकूरजींच्या कृपेने होतं.

Web Title: From kanyadana to miracles, fortune telling in a handful of rice, now Chawalwale Baba is in the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.