दहशतवादापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत..., भारत-इंडोनेशिया करार...; घेण्यात आले महत्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:12 IST2025-01-25T16:10:23+5:302025-01-25T16:12:37+5:30
दहशतवादापासून ते अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्यासंदर्भात करार... पंतप्रधान मोदींनी रामायण आणि महाभारताचाही उल्लेख केला...

दहशतवादापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत..., भारत-इंडोनेशिया करार...; घेण्यात आले महत्वाचे निर्णय
यावर्षी भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. सुबियांतो गुरुवारी (२३ जानेवारी २०२५) रात्री दिल्लीत पोहोचले. हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी आज, शनिवार (२५ जानेवारी २०२५) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. यावेळी भारत आणि इंडोनेशियामध्ये सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली.
दहशतवादापासून ते अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्यासंदर्भात करार -
बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशिया हा आमचा प्रमुख पाहुणा देश होता. आता आपण प्रजासत्ताकाचे ७५ वे वर्षे साजरे करत आहोत आणि इंडोनेशिया याचा एक भाग बनला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी राष्ट्रपती प्रबोवो यांचे भारतात स्वागत करतो."
मोदी पुढे म्हणाले, "२०१८ मध्ये माझ्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान आपण आपली भागीदारी पुढे नेली होती. संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संरक्षण उत्पादनात एकत्रितपणे काम केले जाईल. याशिवाय, सागरी सुरक्षा आणि सेक्युरिटीसंदर्भात झालेल्या करारामुळे, रेस्क्यूमध्ये आपले सहकार्य आणखी मजबूत होईल. गेल्या वर्षी हे ३० अब्ज डॉलरहून अधिकचे जाले आहे."
पंतप्रधान मोदींनी रामायण आणि महाभारताचाही उल्लेख केला -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आसियान आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात इंडोनेशिया हा आमचा महत्त्वाचा भागीदार आहे. या संपूर्ण प्रदेशात शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि नियम-आधारित सुव्यवस्था राखण्यासाठी दोघेही वचनबद्ध आहोत. आम्ही इंडोनेशियाच्या ब्रिक्स (BRICS) सदस्यत्वाचेही स्वागत करतो. या सर्व व्यासपीठावर ग्लोबल साऊथ देशांचे हीत आणि त्यांचे प्राधान्य यावर आम्ही सहकार्य आणि समन्वयाने काम करू." एवढेच नाही तर, "भारत आणि इंडोनेशिया यांचे हजारो वर्षं जुने संबंध आहेत. अगदी रामायण आणि महाभारताच्या कथा आणि बाली जत्रा, हे आपल्या अखंड सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचे एक जिवंत उदाहरण आहे," असेही मोदी म्हणाले.
काय म्हणाले, इंडोनेशियाचे राष्ट्रपती -
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो म्हणाले, "माझ्या पहिल्या भारत दौऱ्यात मला मिळालेल्या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. आज राष्ट्रपतींनी माझे मोठ्या आदराने स्वागत केले. पंतप्रधान मोदी, त्यांचे सरकार आणि मी आणि माझे सरकार "आमच्यात विविध विषयावर स्पष्ट चर्चा झाली. आम्ही समान हिताच्या अनेक प्रमुख क्षेत्रांवर चर्चा केली. आर्थिक क्षेत्रात सहकार्याची पातळी वाढवण्याची आमची इच्छा आहे. मी माझ्या टीमला भारत-इंडोनेशिया सहकार्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.