गायीच्या शेणासमोर अणूबॉम्बही निष्प्रभ - RSS चा दावा
By admin | Published: September 25, 2015 04:10 PM2015-09-25T16:10:27+5:302015-09-25T16:17:30+5:30
गायीचे हायड्रोजन आणि अणूबॉम्बलाही निष्प्रभ करु शकते असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत मुस्लीम राष्ट्रीय मंचाने केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - गायीचे हायड्रोजन आणि अणूबॉम्बलाही निष्प्रभ करु शकते असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत मुस्लीम राष्ट्रीय मंचाने केला आहे. मुस्लिमांनी गोमांस खाऊ नये यासाठी मंचाने एक पुस्तिका तयार केला असून यात हा दावा करण्यात आला आहे.
मुस्लीम राष्ट्रीय मंचाने एक 'गाय आणि इस्लाम' अशी पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेत मुसलमानांनी गोमांस सेवन करु नये असे आऴाहन करण्यात आले आहे. गायीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अणूब़ॉम्ब व हायड्रोजन बॉम्बचा दाखला देण्यात आला आहे. 'शेणाने लिपलेल्या भिंतीवर किरणोत्सर्गाचा परिणाम होत नाही' असा उल्लेख या पुस्तिकेत करण्यात आला आहे. या वैज्ञानिक दाव्यासोबचट धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक दाखले देत गोमांसचे सेवन टाळण्याचा आग्रह पुस्तिकेतून करण्यात आला आहे. इतिसाहातील मुस्लिम राज्यकर्त्यांनीही गोहत्या बंदी केली होता असे यात म्हटले आहे. गोहत्याबंदी मुळे दोन्ही समाजातून बंधूभाव वाढेल असेही पुस्तिकेत नमूद करण्यात आला आहे.