कारचा धक्का लागल्याचे सांगून साडे पाच लाख लांबवले जिल्हा रुग्णालयासमोरील घटना : बोलण्यात गुंतवून दुसर्‍याने काढली बॅग

By admin | Published: June 2, 2016 10:19 PM2016-06-02T22:19:39+5:302016-06-02T22:19:39+5:30

जळगाव: दुचाकीला धक्का लागल्याचे सांगून सुरेश त्र्यंबक नेवे (वय ६० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) या व्यापार्‍याच्या कारमधील साडे पाच लाख रुपयाची बॅग लांबविण्यात आल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हा रुग्णालयासमोर घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होतेे. दरम्यान, जिल्हा पेठ व शहरच्या पोलीस निरीक्षकांचे गुरुवारी चोरट्यांनी चोरीच्या घटनांचीच स्वागत केले.

In front of district hospital, five and a half lakhs long incidents of the incident: another bag removed | कारचा धक्का लागल्याचे सांगून साडे पाच लाख लांबवले जिल्हा रुग्णालयासमोरील घटना : बोलण्यात गुंतवून दुसर्‍याने काढली बॅग

कारचा धक्का लागल्याचे सांगून साडे पाच लाख लांबवले जिल्हा रुग्णालयासमोरील घटना : बोलण्यात गुंतवून दुसर्‍याने काढली बॅग

Next
गाव: दुचाकीला धक्का लागल्याचे सांगून सुरेश त्र्यंबक नेवे (वय ६० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) या व्यापार्‍याच्या कारमधील साडे पाच लाख रुपयाची बॅग लांबविण्यात आल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हा रुग्णालयासमोर घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होतेे. दरम्यान, जिल्हा पेठ व शहरच्या पोलीस निरीक्षकांचे गुरुवारी चोरट्यांनी चोरीच्या घटनांचीच स्वागत केले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, त्र्यंबक नेवे यांची एमआयडीसीत व्ही. सेक्टरमध्ये सनशाईन क्रॉप्ट नावाची पेपर मील आहे. गुरुवारी संध्याकाळी ते शहरात कारने (क्र.एम.एच.१९ ए.एक्स ८७५६) आले होते. घरुन निघताना व्यवसायातील व्यवहाराचे चार लाख रुपये त्यांनी सोबत घेऊन बॅगेत ठेवले होते. संध्याकाळी जोशी पेठेतून आर.कांतीलाल यांच्याकडून त्यांनी एक लाख ४० हजार रुपये घेतले. ही रक्कम त्यांनी आधी चार लाख रुपये ठेवलेल्या बॅगेत ठेवली होती.
रस्त्यात थांबवली कार
रक्कम घेऊन नेवे घरी जाण्यासाठी निघाले असता जिल्हा रुग्णालयाजवळील एका किराणा दुकानाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना पुढे अडविले. एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते, तुमच्या कारचा धक्का लागला असे सांगून त्यांच्याशी बोलायला लागले. धक्का लागला नाही, परंतु तरीही मी चूक झाली समजून माफी मागतो, असे नेवे यांनी त्यांना सांगितले. यावेळी नेवे यांनी बोलण्यासाठी क्लिनर साईडचा काच उघडला होता. एकाने नेवे यांना बोलण्यात गुंतवले तर दुसर्‍याने तीच संधी साधत उघड्या काचेमधून बॅग काढून पळ काढला. काही तरी संशयास्पद प्रकार होत असल्याची जाणीव होताच नेवे यांनी बॅगेवर नजर टाकली असता तितक्यात हेल्मेटधारी पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तर इकडे दुचाकीवरील तरुणाने वळण घेत सुसाट वेगाने दुचाकी नेत पुढे बॅगधारी तरुणाला बसविले. दरम्यान, यावेळी दोन दुचाकीवर तीन जण होते असेही सांगण्यात आले. एक जण पुढे थांबला होता.
व्यापार्‍याला सोबत घेऊन परिसराची पाहणी
हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, उपनिरीक्षक गिरधर पवार, गुन्हे शोध पथकाचे राजू मेढे, अल्ताफ पठाण व रवी नरवाडे यांनी व्यापारी नेवे यांना सोबत घेऊन जिल्हा रुग्णालय व परिसर पिंजून काढला. रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो नेवे यांना दाखविण्यात आले, मात्र त्यांच्यातील ते दोघंही नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: In front of district hospital, five and a half lakhs long incidents of the incident: another bag removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.