संजय दत्तच्या घरासमोर जळगावच्या चोरट्यांची पाकीटमारी
By admin | Published: February 28, 2016 10:31 PM2016-02-28T22:31:50+5:302016-02-28T22:31:50+5:30
जळगाव: पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे पाकीट चोरणार्यांमध्ये जळगावच्या तीन चोरट्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. धरणगावच्या एकाला लागलीच ताब्यात घेण्यात आले होते,तर त्याने जळगावच्या आणखी दोन जणांची नावे सांगितली आहेत.त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलीस जळगावा दाखल झाले आहेत.त्यांनी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा एक जण फरार आहे.
Next
ज गाव: पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे पाकीट चोरणार्यांमध्ये जळगावच्या तीन चोरट्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. धरणगावच्या एकाला लागलीच ताब्यात घेण्यात आले होते,तर त्याने जळगावच्या आणखी दोन जणांची नावे सांगितली आहेत.त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलीस जळगावा दाखल झाले आहेत.त्यांनी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा एक जण फरार आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ात शिक्षा भोगून २५ फेब्रुवारी रोजी संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहातून बाहेर पडला होता. मुंबईत पोहचल्यानंतर त्याच्या पालीहील भागातील निवासस्थानासमोर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत बबन जगन सोनवणे (मुळ रा.धरणगाव ह.मु.उधना, सुरत) याला पाकीट मारतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्यावर खार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावच्या दोघांची नावेखार पोलिसात अटकेत असलेल्या खलसे याच्या चौकशी केली असता त्याने आपल्यासोबत या कामात जळगावचा विशाल भाऊसाहेब मोरे (वय १९ रा.गेंदालाल मील, जळगाव) व आणखी एक जण असल्याचे सांगितले. त्यावरुन खार पोलिसांनी जळगाव शहरचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांच्याशी संपर्क साधून संशयितांची नावे सांगितले. या दोघांना घेण्यासाठी दोन कर्मचारी शनिवारी रात्री जळगावात दाखल झाले होते.रेल्वे स्टेशनवरुनच घेतले एकाला ताब्यातमुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार गंधाले यांनी गुन्हे शोध पथकाचे इम्रान सैय्यद, गणेश शिरसाळे, अकरम शेख, सुधीर सावळे व संजय भालेराव आदींना दोघांचा शोध घेण्यासाठी पाठविले असता त्याच वेळी रेल्वे स्टेशनवरील डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाद सुरु होता. यावेळी पळापळ होत असताना विशाल हा पोलिसांच्या हाती लागला.फोटोवरुन केली खात्रीशहर पोलिसांनी विशालला ताब्यात घेतल्यानंतर खार पोलिसांनी त्याचा फोटो काढून व्हॉटस्ॲपवर त्या पोलीस स्टेशनला पाठविला. त्यांच्या ताब्यात असलेल्या बबनला हा फोटो दाखविला असता त्याने विशालला ओळखले. त्याचा दुसरा साथीदार मात्र मिळून आला नाही.रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. तर विशालला घेवून खार पोलीस रात्रीच रवाना झाले.