ट्रेनसमोर सेल्फी काढणे पडले महागात, २ विद्यार्थी ठार
By Admin | Published: January 17, 2017 08:52 AM2017-01-17T08:52:29+5:302017-01-17T08:57:45+5:30
स्टंट करण्याच्या नादात ट्रेनसमोर सेल्फी काढणे दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सध्या सर्वत ' सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरूणांची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीचा मोह दोन तरूणांच्या जीवावर बेतला असून ट्रेनसमोर सेल्फी काढतानाच ट्रेनने धडक दिल्याने तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे.
फेसबूकवर पोस्ट करण्यासाठी स्टंट करत फोटो काढण्याच्या नादात ९वी आणि १०वीच्या दोन विद्यार्थ्यांचा जीव गेला. यश आणि शुभण असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून ते आपल्या ५-६ मित्रांसह शनिवारी अक्षरधाम मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकजवळ फोटो काढण्यासाठी गेले होते. त्यासाठी त्यांनी १३०० रुपये देऊन एक कॅमेराही भाड्याने घेतला होता. सर्वजण एकेक करून फोटो काढत असतानाचा मागून आलेल्या ट्रेनने यश आणि शुमभ यांना उडवले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या सर्वांना आपला पोर्टफोलिओ तयार करायचा होता आणि त्यासाठीच त्यांनी रेल्वे ट्रॅकची निवड केली. मात्र ते फोटो काढण्यात एवढे मग्न झाले की मागून कधी ट्रेन आली हे त्यांना समजलंच नाही आणि यश व शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Two school students dead after being hit by a train while taking a selfie at Anand Vihar railway track in Delhi pic.twitter.com/k002chcglb
— ANI (@ANI_news) 17 January 2017
(सेल्फी घेताना मुलगी बुडाली)
(सेल्फीपायी गमावला मोबाइल)