शेतकर्यांवरील गुन्ांप्रश्नी सेना आक्रमक प्रचंड घोषणाबाजी: गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
By Admin | Published: January 14, 2016 11:59 PM2016-01-14T23:59:39+5:302016-01-14T23:59:39+5:30
जळगाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्यांवर दाखल गुन्ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते.
ज गाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्यांवर दाखल गुन्ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी एकत्र आले होते. ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. अटक करा, अटक करा शेतकर्यांना अटक करा, दबावाखाली काम करणार्या पोलीस प्रशासनाचा निषेध असो...अशा विविध घोषणा देत हा मोर्चा टॉवर चौक, स्टेडियम चौक, बस स्टॅँड, स्वातंत्र्य चौकामार्गे जिल्हापेठ पोलिस स्टेशनवर धडकला. सर्वांना अटक करादष्काळाने त्रस्त शेतकर्यांना विमा रकमेचा आधार ठरणार असल्याने त्या संदर्भात चौकशीस गेलेल्या व सनदशिर मार्गाने आंदोलन करणार्या शेतकर्यांवर दरोडा, दंगलीचा गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेचा शेतकरी निषेध करत होते. -----आव्हाणेे येथे जमले शेतकरीसकाळी १० वाजता आव्हाने येथे परिसरातील शेतकरी एकत्र आले होते. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कढोली, भादली, कानळदा आदी भागातून हे शेतकरी एकत्र आले होते. आव्हाणे येथे एकत्र आल्यानंतर ट्रॅक्टर व आपापल्या वाहनांनी हे शेतकरी शिवसेना जिल्हा कार्यालयासमोर आले. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. येथेही प्रचंड घोषणा देण्यात येत होत्या. ------अशा होत्या मागण्या-सनदशिर मार्गाने आंदोलन करणार्या शेतकर्यांवरील दंगलीचा गुन्हा रद्द करा- आपल्या न्याय हक्काबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतकर्यांवरील दरोड्याचे कलम रद्द करा- या प्रकाराची पूर्ण चौकशी होईपर्यंत कुणावरही कारवाई होता कामा नये- शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याच्या रकमा त्वरित दिल्या जाव्यात. - खोट्या तक्रारी करणार्या जिल्हा बॅँकेतील अधिकार्यांवरही कारवाई केली जावी-------