सु˜्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत

By Admin | Published: November 14, 2016 02:31 AM2016-11-14T02:31:22+5:302016-11-14T02:31:22+5:30

पुुणे : चलनातून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसु लागला आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील फळविभागातील काही व्यापार्‍यांनी सोमवारपासून थेट व्यापार बंद ठेवण्याची भुमिका घेतली आहे. तर ग्राहकांअभावी माल पडून राहत असल्याने अनेक व्यापार्‍यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.

Fruit sale invariably due to lack of money | सु˜्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत

सु˜्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत

googlenewsNext
ुणे : चलनातून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसु लागला आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील फळविभागातील काही व्यापार्‍यांनी सोमवारपासून थेट व्यापार बंद ठेवण्याची भुमिका घेतली आहे. तर ग्राहकांअभावी माल पडून राहत असल्याने अनेक व्यापार्‍यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.
मागीच पाच दिवसांपासून सु˜्या पैशांअभावी फळबाजारातील उलाढाल मंदावली आहे. सध्या डाळिंब, सीताफऴ, संत्रा, मोसंबी आदी फळ उत्पादक मोठ्या शेतकठयांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहेत. बाजारात सु˜े पैसे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने सुरूवातीला शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी आडत्यांनी खरेदीदारांकडून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा घेतल्या. मात्र, शेतकरी या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. मात्र, दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने या जुन्या लाखो रूपयांच्या नोटांचे काय करायचे असा प्रश्न आडत्यांना पडला आहे. तर दुसरीकडे उधारीचे प्रमाण वाढत चालले आहे. फळबाजारात तुलनेने ५०० व हजार रुपयांच्या पटीत व्यवहार जास्त प्रमाणात होतात. आता हे व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मालाची विक्री होत नसल्याने काही व्यापार्‍यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.
मालाची विक्री होत नसल्याने सोमवारपासून शेतकर्‍यांना बाजारात फळे न आणण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीदारांकडून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. या नोटा पुढे शेतकरी घेत नाहीत. त्यामुळे व्यापाराला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून व्यापार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे एका फळ व्यापार्‍याने सांगितले.
------------------

Web Title: Fruit sale invariably due to lack of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.