JOB Alert : खूशखबर! FSI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:20 PM2021-03-10T17:20:12+5:302021-03-10T17:33:08+5:30
FSI Recruitment 2021 : टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (FSI) एकाच वेळी अनेक पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या रिक्त जागेत (FSI Recruitment 2021) एफएसआयमध्ये कराराच्या आधारावर टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे.
टेक्निकल असोसिएट पदासाठी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोकरीची अधिसूचना fsi.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. नोटिफिकेशननुसार या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 34 वेगवेगळ्या शहरांमध्ये नियुक्त केले जाईल.
कसा कराल अर्ज?
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मार्चपर्यंत सुरू आहे. यानंतर अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करण्याची लिंक काढून टाकली जाईल. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम fsi.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर एफएसआय न्यूज वर जा.
- आता 4 मार्च 2011 च्या पुढे दिलेल्या‘Notice for recruitment of forty four (44) Technical Associates’ लिंकवर क्लिक करा.
- या रिक्त स्थानाचे संपूर्ण तपशील आता पीडीएफ स्वरूपात दिसतील.
- तपशील वाचल्यानंतर ‘Apply Online for the post of Technical Associates’ या लिंकवर क्लिक करा.
- आता अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल.
– अर्ज भरा आणि प्रिंट काढा.
वॅकेंसी डिटेल्स
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (एफएसआय) जारी केलेल्या या रिक्त जागांनुसार एकूण 44 पदांवर भरती होईल. यात उमेदवारांची निवड कराराच्या आधारे होईल. हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, मणिपूर, मेघालय यासह 34 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड वॉक इन टेस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. वॉक इन टेस्टमध्ये लेखी आणि हँड्स-ऑन चाचणीचा समावेश असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Bank Jobs 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत भरतीhttps://t.co/DWM4NelUWA#ReserveBankofIndia#Bank#job
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021