बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं 'विष'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:26 AM2024-12-03T10:26:31+5:302024-12-03T10:29:15+5:30

FSSAI ने एक मोठे पाऊल उचलत पॅकेज्ड ड्रिंकिंग आणि मिनरल वॉटरला हाय रिस्कच्या अन्न श्रेणीमध्ये ठेवले आहे.

FSSAI has put packaged drinking and mineral water in the high risk food category | बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं 'विष'

बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं 'विष'

Mineral Water : तहान लागल्यावर घराबाहेर असताना साधारणपणे बहुतेक लोक बाहेर त्यांच्या आरोग्याचा विचार करून बाटलीबंद पाणी घेतात. ज्यावर 'मिनरल वॉटर' असे लिहिलेले असेल. सामान्यत: चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते. पण हे बाटलीबंद पाणी तुमच्या आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही याची तुम्हाला जाणीवही नसेल. बाटलीबंद पेय आणि मिनरल वॉटर आरोग्यासाठी घातक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने अशा  मिनरल वॉटरला 'हाय रिस्क' श्रेणीत ठेवले आहे.

ट्रेन, बस किंवा फक्त प्रवास करताना तुम्ही जे मिनरल वॉटर पाणी पिता ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटीने (एफएसएसएआय) सोमवारी बाटलीबंद केलेले पेय आणि मिनरल वॉटरला हाय रिस्क खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये टाकलं. त्यामुळे आता बाटलीबंद पाण्याची अनिवार्य तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र मिळविण्याची अनिवार्य अट काढून टाकल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बाटलीबंद केलेले पेय आणि पाणी हाय रिस्क श्रेणीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता या उत्पादनांच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि त्यांची तपासणी केली जाईल आणि थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल. एफएसएसएआयचा हा निर्णय म्हणजे बाटलीबंद पाणी किती सुरक्षित आहे याचा पुरावा देत आहे. 

दुसरीकडे, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व्यावसायिकांनी यापूर्वी सरकारकडे नियम सुलभ करण्याची मागणी केली होती. बीआयएस आणि एफएसएसएआय या दोघांना दुहेरी प्रमाणीकरणाची आवश्यकता काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तज्ज्ञांचे मत आहे की नवीन नियम प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यास आणि उत्पादकांवरील भार कमी करण्यास मदत करू शकतात.

बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पाण्यात प्लॅस्टिकमधील रसायने मिसळू शकतात, जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. बीपीए (बिस्फेनॉल ए) सारख्या बाटल्यांमध्ये असलेली रसायने, त्याच बाटलीमध्ये पाणी जास्त काळ ठेवल्यास फॅथलेट्स पाण्यात विरघळू शकतात. या रसायनांचे सेवन केल्यावर कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. नैसर्गिक स्रोतांमधून येणाऱ्या पाण्यामध्ये सामान्यतः कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिजे असतात, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. परंतु बाटलीबंद पाण्यात या खनिजांची कमतरता असू शकते. कारण पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत ही पोषकतत्त्वे नष्ट होतात.

काही अहवालांनुसार, बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. हे छोटे प्लास्टिकचे कण शरीरात प्रवेश करू शकतात आणि पोट, आतडे आणि इतर अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या, कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.
 

Web Title: FSSAI has put packaged drinking and mineral water in the high risk food category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.