इंधनही संपत आलेले; अमेरिकेच्या वादळातून एअर इंडियाच्या पायलटनं 370 जणांना दिला पुनर्जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:19 PM2018-09-18T12:19:31+5:302018-09-18T12:26:20+5:30
शेवटची 37 मिनिटे घाबरवणारी; वादळाने 370 प्रवाशांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला
न्यूयॉर्क : ''हवामान खराब आहे, इंधनही संपत आलेय, आम्ही पुरते अडकलोय'', हे गंभीर शब्द आहेत एअर इंडियाच्या पायलटचे. अमेरिकेसाठी 11 सप्टेंबरला एअर इंडियाच्या दिल्ली-जेएफके AI 101 विनाथांबा बोइंग 777 विमानाने उड्डाण केले खरे, मात्र तेथील वादळाने 370 प्रवाशांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला. तब्बल दीड तास हवेत घिरट्या घातल्यानंतर वरिष्ठ पायलट रुस्तम पालिया यांनी विमान सुखरुप विमानतळावर उतरवले. मात्र, शेवटची 37 मिनिटे घाबरवणारी होती.
अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यात फ्लॉरेन्स वादळाने थैमान घातले होते. यावेळी दिल्लीवरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विनाथांबा विमान AI 101 न्युयॉर्कजवळ पोहोचले होते. मात्र, विमानात इंधन कमी उरले होते. अशातच इन्स्ट्रमन्ट लैंडिंग सिस्टम (ILS) हा कमी दृष्यमानतेमध्ये काम करणारे यंत्र बंद पडले. यामुळे विमानाला जास्त दृष्यमानता असलेल्या धावपट्टीवर उतरवण्याती गरज होती. मात्र, हवामान खराब असल्याने पायलट विमान उतरवू शकत नव्हते. यामुळे कॅप्टन पालिया आणि सिंह यांना विमान उतरविण्याचा निर्णय रद्द करावा लागला. विमान कमी इंधनावरच हवेत घिरट्या घालू लागले.
जेकेएफ विमानतळावरील नियंत्रण कक्षासोबत पायटांचे बोलने ऐकल्यावर किती गंभीर परिस्थिती ओढवली होती याची कल्पना येते. जेकेएफ विमानतळावर AI 101 च्या विमानाअगोदर दुसरे विमान उतरणार होते. कॉकपीटने इशारा दिला. यामुळे विमानाने पहिली घिरटी घातली. दुसऱ्या प्रयत्नावेळी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विमानातील प्रणालीचील बिघाडामुळे अन्य उपकरणेही बंद होऊ लागली.
कॅप्टन पालिया आणि सिंह यांनी नियंत्रण कक्षाला न घाबरता विमान बिघडल्याचे सांगितले. यामुळे पुढे ही उपकरणे नीट होतील का याबाबत शंकाही व्यक्त केली. नियंत्रकाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याने अॅटोलँडचा पर्याय निवडण्यास सांगितले. मात्र, विमानाचे दोन्ही रेडियो अल्टीमीटर बंद पडले होते. यामुळे वैमानिकांनी नकार दिला. तसेच ट्रैफिक कोलिजन अवॉइडेंस सिस्टमही बंद पडल्याने दिसत नसताना विमान उतरवणे धोक्याचे असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या सुरक्षित धावपट्टीचा पर्याय देण्यास सांगितले.
#FlyAI : AI144(EWR/BOM)STD 1415LT of 17th Sep' grounded at EWR due to technical reasons. Pax being accomodated in AI102(JFK/DEL) and AI172(EWR/LHR/AMD). Next update shortly.
— Air India (@airindiain) September 17, 2018
यावेळी नेवार्क, बोस्टन, लोगान, वॉशिंग्टन, डलास सारख्या जवळच्या विमानतळांचाही पर्याय सुचविण्यात आला. मात्र, तेवढे इंधन विमानात नव्हते. एटीसीने विमानात किती वेळासाठी इंधन उरल्याचे विचारले. तेव्हाच नेवार्कच्या विमानतळावरील वातावरण निवळायला लागले. यामुळे एटीसीने नेवार्कला विमान नेण्यास सांगितले. तसे विमान नेवार्ककडे वळले.
विमानात यावेळी 7200 किलो इंधन होते. 14 तासांच्या उड्डाणानंतर एवढे इंधन राहिले होते. या दीड तासांच्या हवेतील थरारक कसरतींनंतर विमान शेवटी पायलटांनी मोठ्या कौशल्याने नेवार्कला सुखरुप उतरविले. विमानात आणखी दोन पायलटही होते.
एअर इंडियाने एवढ्या कठीण परिस्थितीत धैर्य दाखविल्याबद्दल चारही पायलटांचे आभार मानले आहेत.