माहिती आहे का ? पेट्रोल, डिझेल भरता तेव्हा स्वच्छ शौचलायासाठीही तुम्ही देता पैसे

By शिवराज यादव | Published: August 23, 2017 03:07 PM2017-08-23T15:07:16+5:302017-08-23T16:16:01+5:30

पेट्रोल पंपांवर असणारी शौचालयं स्वच्छ ठेवण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारले जातात

Fuel price also includes a fund for toilets | माहिती आहे का ? पेट्रोल, डिझेल भरता तेव्हा स्वच्छ शौचलायासाठीही तुम्ही देता पैसे

माहिती आहे का ? पेट्रोल, डिझेल भरता तेव्हा स्वच्छ शौचलायासाठीही तुम्ही देता पैसे

googlenewsNext

नवी दिल्ली, दि. 23 - अनेकांना माहित नसेल पण जेव्हा पेट्रोल पंपावर जाऊन आपण पेट्रोल किंवा डिझेल भरतो तेव्हा लीटरमागे चार ते सहा पैसे आपण स्वच्छ शौचालयासाठी देत असतो. पेट्रोल पंपांवर असणारी शौचालयं स्वच्छ ठेवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आकारले जात असतात. पेट्रोलिअम मंत्रालयचे अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असले तरी जमा होणारी रक्कम पर्याप्त नसल्याचा दावा पेट्रोल पंप मालक करत आहेत. 

पेट्रोल पंप वाटप करताना आखलेल्या नियमांमध्ये स्वच्छ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची अट आहे. ज्या पेट्रोल पंपावर शौचालयांची अवस्था बिकट आहे, तसंच जे पेट्रोलपंप शौचलायांची योग्य काळजी घेत नाही आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं पेट्रोलिअम मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितलं आहे. 

एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'डिझेल - पेट्रोल विक्री करताना अतिरिक्त आकारण्यात येणारे पैसे पर्याप्त नसल्याच्या पेट्रोल पंप मालकाचा दावा योग्य आहे, मात्र ते कमिशन घेतात हेदेखील खरं आहे. कोणतीही कारणं न देता अट पुर्ण करणं अनिवार्य आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी स्वच्छता अॅपचा वापर करावा, आणि या माध्यमातून शौचालयांची माहिती द्यावी. या शौचालयांचा वापर कोणीही करु शकतं'. 

ऑल इंडिया पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितलं आहे कीस 'एका पेट्रोल पंपावर दरमहिना किमान एक लाख 70 हजारांच्या पेट्रोल - डिझेलची विक्री होते. यानुसार शौचलयांची देखभाल करण्यासाठी नऊ हजार रुपये जमा होतात. मात्र शौचालयाची देखभाल घ्यायचं ठरल्यास किमान तीन जणांना कामावर ठेवावं लागेल. याशिवाय पाणी आणि इतर गरजेच्या वस्तूंचा वेगळा खर्च असतो'. 

पेट्रोल दराचा भडका, भाव उच्चांकी पातळीवर
गेल्या दीड महिन्यात पेट्रोलच्या भावात लिटरमागे साधारण तीन ते चार रुपये आणि गेल्या वर्षभरात तब्बल १२ ते १४ रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १९ ऑगस्ट रोजी हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोलचे दर ७७ रुपये५४ पैसे होते. वर्षभरापूर्वी १६ ऑगस्टला हेच दर ६५ रुपये ०३ पैसे होते. म्हणजे वर्षभरात लिटरमागे झालेली वाढ १२ रुपये ५१ पैसे येते. दीड महिन्यापूर्वी मुंबईत ७४ रुपये ३५ पैसे असलेले पेट्रोलचे दर तीन रुपये १९ पैशांनी वाढले आहेत.  केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचा आढावा १५ दिवसाआड घेण्याऐवजी दररोज घेण्याचा निर्णय यंदा १६ जूनपासून घेतला.  त्यामुळे हळूहळू होणारी ही दरवाढ पटकन कुणाच्या लक्षातही येत नाही कारण दिवसाला १०-१२ पैसे झालेली वाढ फार वाटत नाही पण कालांतराने तिचा एकत्रित परिणाम मोठा झालेला दिसतो. 
 

 

Web Title: Fuel price also includes a fund for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.