इंधन दरकपात सुरुच; 11 दिवसांत पेट्रोल 2.75 रुपयांनी घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 07:07 AM2018-10-28T07:07:15+5:302018-10-28T07:07:52+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असून याचा काहीसा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असून याचा काहीसा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी कहर केलेला असताना मागील 11 दिवसांपासून या किंमती काही पैशांनी कमी होऊ लागल्या आहेत. या काळात पेट्रोलची किंमत 2.75 तर डिझेलची किंमत 1.74 रुपयांनी कमी झाली आहे.
आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 0.40 पैशांनी कमी झाली असून किंमत 80.05 रुपये प्रती लिटरसाठी मोजावे लागणार आहेत. तर डिझेलची किंमत 0.33 पैशांनी कमी झाली असून प्रती लिटरसाठी 74.05 रुपये मोजावे लागणार आहेत.
Petrol&diesel prices in #Delhi today are Rs 80.05 per litre (decrease by Rs 0.40) & Rs 74.05 per litre (decrease by Rs 0.33), respectively. Petrol&diesel prices in #Mumbai today are Rs 85.54 per litre (decrease by Rs 0.39) & Rs 77.61 per litre (decrease by Rs 0.35), respectively. pic.twitter.com/4LEfw9bTZD
— ANI (@ANI) October 28, 2018
तर मुंबईमध्ये पेट्रोल 0.39 पैशांनी आणि डिझेल 0.35 पैशांनी कमी झाले आहे. यामुळे आज पेट्रेलचे दर 85.54 रुपये आणि डिझेलचे दर 77.61 रुपये असणार आहेत.