Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 03:39 PM2020-06-07T15:39:38+5:302020-06-07T15:51:01+5:30

लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो.

Fuel Price first time 80 days prices petrol diesel increase across country | Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली आहे. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली. 

मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेल 60 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 78.91 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 60 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 68.79 रुपये आहे. दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर 60 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 71.86 रुपये आणि 69.99 रुपये मोजावे लागतील. चेन्‍नईमध्ये पेट्रोल 76.07 रुपये आणि डिझेल 68.74 रुपये आहे. 

लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा सेसमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. यानंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेला बदल कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविला जातो. कारण 80 टक्के कच्चे तेल आयात करतो.

इंडियन ऑईलने दिलेल्या  माहितीनुसार एप्रिल 2020 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी 46 टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल 2019 च्या तुलनेत या काळात पेट्रोलचे 61 टक्के, डिझेलचे 56.7 टक्के आणि एटीएफच्या विक्रीत 91.5 टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची मागणी सुधारली. मे 2019 च्या तुलनेत पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाची मागणी 38.9 टक्के कमी होती. देशातील मॉल आणि बाजार सुरू झाल्याने इंधनाची मागणी वाढेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'बजाज कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत'; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'

CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

Web Title: Fuel Price first time 80 days prices petrol diesel increase across country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.