Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:31 AM2020-06-16T09:31:28+5:302020-06-16T10:29:40+5:30
Fuel Price: सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर इंधन कंपन्यांनी दररोज होत असलेला दरातील बदल थांबविला होता. त्यानंतर 82 दिवसांनंतर 7 जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचे दर लिटरला 4.87 रुपये इतके वाढले आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडणार असून आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेल महागणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती.
Petrol and diesel prices at Rs 76.73/litre (increase by Re 0.47) and Rs 75.19/litre (increase by Re 0.57), respectively in Delhi today. pic.twitter.com/o3rtmfpld3
— ANI (@ANI) June 16, 2020
सरकारने उत्पादन शुल्कामध्ये 3 रुपये प्रति लीटरची वाढ केली होती. तेल कंपन्यांनी 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली दरम्यान अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पुढील दोन आठवड्यांमध्ये होणाऱ्या वाढीबरोबरच 60 पैसे प्रति लीटर या दराने किंमती कमी देखील होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मे मध्ये तेलाचा एकूण खप 1.465 कोटी टन राहिला आहे. जो एप्रिलपेक्षा 47.4 टक्क्यांनी जास्त आहे.
CoronaVirus News : डॉक्टरांनी पीपीई सूटवर लावला फोटो; कारण वाचून तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/UqiNrRD3qd#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2020
मार्चमध्ये सरकारेन पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 3 रुपये प्रति लीटरने वाढवली होती. त्यानंतर सुद्धा तेल कंपन्यांनी किेमतीमध्ये टॅक्स वाढवला नव्हता. त्यामुळे आता त्यांच्याकडून रोज पेट्रोलच्या किमती वाढवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी देखील वाढली आहे. तसेच घसरणारे रूपयाचे मूल्य तेल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. लॉकडाऊनमध्ये तेल कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी तेल कंपन्या प्रयत्नशील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोना नष्ट होण्यामागे 'हे' आहे खास कारणhttps://t.co/Jn7o4b1xAh#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण
CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा
CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?
Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"
Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा
CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला