सलग दहाव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 40 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 10:17 AM2018-10-27T10:17:57+5:302018-10-27T10:26:24+5:30

सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैशांनी  स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 85.93 रुपये मोजावे लागतील.

Fuel prices: Petrol, diesel rates continue to decline | सलग दहाव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 40 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त

सलग दहाव्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 40 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त

Next

मुंबई - सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैशांनी  स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 85.93 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 37 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 77.96 रुपयांवर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत आहे. 



दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 40 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 80.45 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 35 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 74.38 रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत. 

गेल्या दहा दिवसांपासून देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. सध्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. तसेच पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांनाही सत्ताधारी भाजपला सामोरे जायचे असल्याने इंधनाच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकार चिंतेत होते. यामुळे गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन पुरवठादार कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर इंधनाच्या दरांमध्ये घसरण पहायला मिळत आहे. 
 

Web Title: Fuel prices: Petrol, diesel rates continue to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.