सरकारला इंधन दरवाढ महाग पडेल; रामदेव बाबा यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:57 AM2018-09-18T00:57:54+5:302018-09-18T06:39:39+5:30
आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे उघडपणे समर्थन करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांनी महागाई व इंधन दरवाढीवरून टीकास्त्र सोडले
Next
नवी दिल्ली : आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे उघडपणे समर्थन करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांनी महागाई व इंधन दरवाढीवरून टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींना इंधन दरकपात करावीच लागेल. न केल्यास सरकारलाच ही महागाई खूप महागात पडेल, असा इशाराही रामदेव यांनी दिला. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास मी ३५ ते ४० रुपयांत पेट्रोल व डिझेल विकेन. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणावे. यावेळी आपण भाजपचा प्रचार करणार का, असे विचारता त्यांनी नकारार्थी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले की मी सर्व पक्षांचा आणि तरीही अपक्षच आहे.