Today's Fuel Price: इंधन दर घसरणीची 'नवमी'; पेट्रोल चार आणे, तर डिझेल केवळ 8 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 07:37 AM2018-10-26T07:37:27+5:302018-10-26T07:41:35+5:30
Today's Fuel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये घसरण सुरु असून आज पेट्रोलपेट्रोल 25 पैसे, तर डिझेल केवळ 8 पैशांनी स्वस्त झाले.
आज दिल्ली मध्ये पेट्रोल 80.85 रुपये प्रती लिटर तर डिझेल 74.73 रुपये प्रती लिटर आहे. दिल्लीमध्ये 0.7 पैशांनी पेट्रोलचा दर उतरला आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 86.33 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 78.33 रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबईमध्ये डिझेल 0.8 पैशांनी स्वस्त झाले आहे.
Petrol&diesel prices in #Delhi today are Rs 80.85 per litre (decrease by Rs 0.25) & Rs 74.73 per litre (decrease by Rs 0.07), respectively. Petrol&diesel prices in #Mumbai today are Rs 86.33 per litre (decrease by Rs 0.25) & Rs 78.33 per litre (decrease by Rs 0.08), respectively. pic.twitter.com/fVdzyo9fnV
— ANI (@ANI) October 26, 2018
गेल्या नऊ दिवसांपासून देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. सध्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. तसेच पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांनाही सत्ताधारी भाजपला सामोरे जायचे असल्याने इंधनाच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकार चिंतेत होते. यामुळे गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन पुरवठादार कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर इंधनाच्या दरांमध्ये घसरण पहायला मिळत आहे.