लाल किल्ला हिंसाचारातील फरारी आरोपी लखबीरसिंहचे उद्या शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:02 IST2021-02-22T01:05:40+5:302021-02-22T07:02:47+5:30
लखबीरसिंहने एक व्हिडीओ जारी करून खळबळ माजविली आहे.

लाल किल्ला हिंसाचारातील फरारी आरोपी लखबीरसिंहचे उद्या शक्तिप्रदर्शन
बलवंत तक्षक
चंदीगढ : नव्या कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी दिल्लीत लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचारातील फरारी आरोपी लखबीरसिंह सिधाना ऊर्फ लक्खा हा येत्या मंगळवारी, २३ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील भटिंडा येथे शक्तिप्रदर्शन करणार आहे. लखबीरसिंहला पकडण्यासाठी पोलिसांनी याआधीच १ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
लखबीरसिंहने एक व्हिडीओ जारी करून खळबळ माजविली आहे. त्यात त्याने भटिंडा जिल्ह्यातील महाराज गावामध्ये मंगळवारी शक्तिप्रदर्शन करण्याचे जाहीर केले आहे. त्याचे अनुयायी मोर्चा काढणार की निदर्शने करणार, हे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. महाराज हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या वाडवडिलांचे गाव आहे. लखबीरसिंहला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम आणखी व्यापक केली आहे.