हरियाणातही प्रचाराला मिळाला पूर्णविराम

By admin | Published: October 14, 2014 12:43 AM2014-10-14T00:43:03+5:302014-10-14T00:43:03+5:30

महाराष्ट्राप्रमाणोच हरियाणातही सोमवारी सायंकाळी प्रचाराचे वादळ शांत झाले. बुधवारी हरियाणातील 1 कोटी 55 लाख मतदार 9क् आमदारांना निवडण्यासाठी मतदान करणार

Full-time promotion in Haryana also | हरियाणातही प्रचाराला मिळाला पूर्णविराम

हरियाणातही प्रचाराला मिळाला पूर्णविराम

Next
नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणोच हरियाणातही सोमवारी सायंकाळी प्रचाराचे वादळ शांत झाले. बुधवारी  हरियाणातील 1 कोटी 55 लाख मतदार 9क् आमदारांना निवडण्यासाठी मतदान करणार असून, त्यासाठी रिंगणात 1351 उमेदवार आहेत.
मावळत्या विधानसभेत काँग्रेस 4क्,  इंडियन नॅशनल लोकदल 31,भाजपा 4 व 7 अपक्ष आमदार आहेत. भाजपाचे 4आमदार निवडून आले होते, तेव्हा 72 जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. यावेळी काँग्रेस, भाजपा, इंडियन नॅशनल लोकदल, हरियाणा चेतना पार्टी, हरियाणा लोकहित पार्टी व बसपाचे उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभानंतर येथील मतदारांनी नेमक्या कोणत्या मुद्यांवरून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले आहे, ते 19 रोजी कळेल. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 4 आमदार निवडून आले तर 72 जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. (विशेष प्रतिनिधी)
 
अशी आहे स्थिती
15} मतदार 18 ते 25 वयोगटातील, 45 टक्के स्त्री मतदार 
पक्षनिहाय संख्या
9क् काँग्रेस, 9क् भाजपा, 87 बसपा
88  हरियाणा लोकहित पार्टी 
65 हरियाणा जनहित काँग्रेस
14 सीपीआय, 17 सीपीएम

 

Web Title: Full-time promotion in Haryana also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.