ठराव प्रकरणात आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज वाद : उपमहापौरांनी मागितली बाजू मांडण्यासाठी मुदत

By admin | Published: December 23, 2015 12:17 AM2015-12-23T00:17:30+5:302015-12-23T00:17:30+5:30

जळगाव : मनपा आयुक्तांकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यासंदर्भात उपमहापौरांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी कामकाज झाले. त्यात आयुक्तांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून उत्तर दाखल करण्यासाठी उपमहापौरांच्यावतीने मुदत मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.

Functional dispute in the resolution of the case now on 3 February: Demand for the demanded by the Deputy Mayor | ठराव प्रकरणात आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज वाद : उपमहापौरांनी मागितली बाजू मांडण्यासाठी मुदत

ठराव प्रकरणात आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज वाद : उपमहापौरांनी मागितली बाजू मांडण्यासाठी मुदत

Next
गाव : मनपा आयुक्तांकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यासंदर्भात उपमहापौरांनी दाखल केलेल्या दाव्यात मंगळवारी कामकाज झाले. त्यात आयुक्तांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून उत्तर दाखल करण्यासाठी उपमहापौरांच्यावतीने मुदत मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी आता ३ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.
ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करीत उपमहापौरांनी मनपा आयुक्तांविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यासोबत ५० ठरावांची यादीही दिली आहे. त्यात द्विसदस्यीय खंडपीठाने आयुक्तांना याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आयुक्तांनी हे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्याची प्रत शनिवारी वादी यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी त्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली आहे.
-------
३ फेब्रुवारी रोजी कामकाज
याप्रकरणी न्यायालयाने आता ३ फेब्रुवारीची तारीख दिली आहे.

Web Title: Functional dispute in the resolution of the case now on 3 February: Demand for the demanded by the Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.