...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 01:20 PM2020-09-30T13:20:17+5:302020-09-30T13:23:49+5:30

दोन महिला गेल्या काही महिन्यांपासून जौनपूरमधील एका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहे.

funeral burn dead body cemetery two female jaunpur uttar pradesh | ...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ

...म्हणून स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची महिलांवर आली वेळ

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो लोक बेरोजगार झाले असून काम नसल्याने काहींनी टोकाचं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या काळात काही धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. काम नसल्याने काही जणांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये घडली आहे. कुटुंबीयांचं पोट भरण्यासाठी दोन महिलांवर स्मशानभूमीत काम करण्याची वेळ आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला गेल्या काही महिन्यांपासून जौनपूरमधील एका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने महिला हे काम करत आहे. काही ठिकाणी महिलांना स्मशानभूमीत सहसा जाऊ दिलं जात नाही. मात्र आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी महिला हे काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या गंगा-गोमतीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत लोक अंत्यसंस्कारासाठी येत असतात. 

सर्वांचा विरोध सहन करत काम करणं ठेवलं सुरू

दररोज जवळपास 8-10 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. या सर्व मृतदेहांची जबाबदारी या दोन महिलांवर असते. सुरुवातीला महिला मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याने काही लोकांनी त्यांना विरोध केला. मात्र या दोन महिलांनी सर्वांचा विरोध सहन करत आपलं काम करणं सुरू ठेवलं. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. अशा वेळी पोट भरण्याचे इतर कोणतेही साधन नव्हते. तसेच शेतजमीन देखील नव्हती. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्मशानभूमीत काम करण्याचा घेतला निर्णय

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महिलांनी स्मशानभूमीत काम करण्याचा निर्णय घेतला. एका महिलेचे पती आणि सासरे हे काम करत होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तिने हे काम करण्याचा निर्णय घेतला. मुलांची जबाबदारी असल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी हे काम करत असल्याची माहिती महिलांनी दिली आहे. त्या दररोज स्मशानभूमीत काम करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: funeral burn dead body cemetery two female jaunpur uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.