जिवंत जाळलेल्या पुजाऱ्यावर ४८ तासांनी अंत्यसंस्कार; जमिनीच्या वादातून घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:47 AM2020-10-11T00:47:04+5:302020-10-11T03:24:06+5:30

राजस्थान । कुटुंबियांना १0 लाख देणार

Funeral on a burnt priest 48 hours later; Incidents from land disputes | जिवंत जाळलेल्या पुजाऱ्यावर ४८ तासांनी अंत्यसंस्कार; जमिनीच्या वादातून घटना

जिवंत जाळलेल्या पुजाऱ्यावर ४८ तासांनी अंत्यसंस्कार; जमिनीच्या वादातून घटना

googlenewsNext

सपोटरा/करौली : राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील सपोटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुकना गावात जमिनीच्या वादातून जिवंत जाळण्यात आलेल्या पुजाºयाच्या मृतदेहावर ४८ तासांनंतर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत पुजारी बाबूलाल यांना न्याय मिळावा, अशी मागणी करीत डॉ. किरोडीमल मीणा, डॉ. मनोज राजौरिया आणि रामचरण बोहरा, हे तीन खासदार धरण्यावर बसलेले होते. पीडित कुटुंबाला द्यावयाच्या भरपाईच्या पॅकेजवर सहमती झाल्यानंतर सायंकाळी बाबूलाल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी स्थानिक खासदार मनोज राजोरिया आणि गंगापूरसिटीचे माजी आमदार मानसिंग मीणा सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात दोषी आढळल्यास त्यास निलंबित केले जाईल. हलगर्जीपणा केल्याबद्दल गावच्या तलाठ्यास हटविले जाईल. पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सरकारसोबत वाटाघाटी होऊन मृताच्या कुटुंबास देण्यात येणाºया भरपाई पॅकेजवर ४ वा. सहमती झाली. त्यानुसार, मृताच्या परिवारास १0 लाख रुपयांची भरपाई, तसेच एका सदस्यास नोकरी देण्यात येईल.

Web Title: Funeral on a burnt priest 48 hours later; Incidents from land disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.