हुतात्मा मनदीप यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Published: October 31, 2016 07:12 AM2016-10-31T07:12:58+5:302016-10-31T07:12:58+5:30

मनदीप सिंग यांच्यावर रविवारी त्यांचे जन्मगाव अंतेहरी (जि.कुरुक्षेत्र) येथे सरकारी सन्मानाने सकाळी ११.१४ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral on Martyr Mandeep | हुतात्मा मनदीप यांच्यावर अंत्यसंस्कार

हुतात्मा मनदीप यांच्यावर अंत्यसंस्कार

googlenewsNext


कुरुक्षेत्र : जम्मू काश्मीरमधील कुपवारा येथे मछील कारवाईत शुक्रवारी रात्री हौतात्म्य प्राप्त झालेले लष्कराचे जवान मनदीप सिंग यांच्यावर रविवारी त्यांचे जन्मगाव अंतेहरी (जि.कुरुक्षेत्र) येथे सरकारी सन्मानाने सकाळी ११.१४ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांनी मनदीप यांच्या शरीराचे भयंकर हाल केले. मनदीप हे १७ व्या शिख रेजिमेंटचे जवान होते.
अंबाला येथील लष्करी रुग्णालयातून मनदीप सिंग यांचे पार्थिव लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी अंतेहरीत आणले. यावेळी समाजातील सगळ््या थरांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी ‘शहीद मनदीप अमर रहे,भारत माता की जय व पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. मनदीप यांच्या चितेला त्यांचे वडील फूलसिंग यांनी अग्नी दिला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही यावेळी उपस्थित होते. माझ्या मुलाच्या हौतात्म्याचा सूड पाकिस्तानवर घ्या, अशी विनंती मनदीपच्या आईने खट्टर यांना केली. खट्टर यांनी मनदीपच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये भरपाई जाहीर करून होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अंतेहरीच्या ग्रामस्थांनी दिवाळी साजरी न करता प्रत्येक घरात मनदीपच्या स्मृतिप्रित्यर्थ पणती लावण्याचे ठरवले. (वृत्तसंस्था)

Web Title: Funeral on Martyr Mandeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.