भागडीत बिबट्याचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 12:04 AM2016-01-26T00:04:59+5:302016-01-26T00:04:59+5:30

मंचर : तालुक्याच्या पूर्व भागातील भागडी येथे बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आज झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे.

The fury of the leopard grew in the rush | भागडीत बिबट्याचा उपद्रव वाढला

भागडीत बिबट्याचा उपद्रव वाढला

Next
चर : तालुक्याच्या पूर्व भागातील भागडी येथे बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आज झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे.
भागडी (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, बिबट्याने जनावरांचा फडशा पाडला आहे. पाच ते सहा कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. जुन्नर तालुक्यात रानमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना ताजी असल्याने भीती अजून वाढली आहे. वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास भीत आहेत. नुकताच बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला होता. भागडी गावची ग्रामसभा माजी सरपंच किसन उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याने तातडीने पिंजरा लावावा, बिबट्याला जेरबंद करून ग्रामस्थांना भीतीतून बाहेर काढावे, अशी मागणी रामदास आगळे यांनी केली आहे.

Web Title: The fury of the leopard grew in the rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.