राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

By admin | Published: September 26, 2014 12:08 AM2014-09-26T00:08:28+5:302014-09-26T00:08:28+5:30

युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे

Future of the alliance's fort on the foot of NCP | राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

राष्ट्रवादी मधील फुटीवर युतीच्या किल्ल्याचे भवितव्य

Next

वाडा : शिवसेना-भाजपा युतीचे वर्चस्व असलेल्या भिवंडी ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट करून भाजपात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट तर भाजपा मधील निष्ठावंताचा एक गट असे दोन गट तयार झाल्याने ते एकत्र येऊन कितपत लढत देऊ शकतात. यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा फायदा घेऊन आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे.
एकेकाळी काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पूर्वीचा वाडा विधानसभा क्षेत्र तर आत्ताचा भिवंडी ग्रामीण मतदार संघ गेल्या २५ वर्षांत युतीने काबीज करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागरीकरण झालेल्या भागात युतीने चांगला जम बसविला असला तरी ग्रामीण भागात युतीला पाहिजे तशी पकड बसविता आलेली नाही.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीला बहूमत मिळविता आले नाही तर काँग्रेसला आपली ताकद दाखविता आली नाही. मात्र राष्ट्रवादीने जिल्हापरिषदेवर आपला झेंडा कायम ठेवला आता मात्र पक्ष फुटीमुळे इतर भागांप्रमाणेच भिवंडी ग्रामीण मतदार संघात राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत.
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती. परंतु जिल्हा विभाजनाने पालघर जिल्ह्यात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील असे चित्र दिसत आहे. मात्र आयाराम-गयारामांचा युतीला कितपत फायदा होतो ते निष्ठेने काम करतील का? कारण हे कार्यकर्ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ाहे. भाजपाच्या २५ वर्षांच्या राजवटीला जनता कंटाळली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अतिश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे या मतदार संघात चुरस वाढली आहे. त्यामुळे विष्णू सवरांना भाजपा तारणार की पाडणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Future of the alliance's fort on the foot of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.