भारतीय असल्याची भावना डोळ्यासमोर ठेवल्यास देशाचे भवितव्य उज्वल: फुर्तादो

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:06+5:302014-12-20T22:27:06+5:30

The future of the country will be bright: if you look at the feeling of being a bright Indian | भारतीय असल्याची भावना डोळ्यासमोर ठेवल्यास देशाचे भवितव्य उज्वल: फुर्तादो

भारतीय असल्याची भावना डोळ्यासमोर ठेवल्यास देशाचे भवितव्य उज्वल: फुर्तादो

Next
>मडगाव : जात,पात,धर्म व भाषा जरी वेगवेगळ्या असल्यातरी आपण भारतीय आहोत ही भावना डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास देशाचे भवितव्य उज्वल आहे असे प्रतिपादन कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गोवा मुक्ती दिना निमीत्त आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदन केल्या नंतर बोलताना केले.
गोवा मुक्तीदिना निमीत्त स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे स्मरण करून त्याच्या कार्याला सलाम केला पाहीजे त्याच्यामूळेच गोव्याला मुक्ती मिळाली. स्वातंत्र्य सैनिकाबरोबरच शेतकरी शिक्षक याचाही गोवामुक्ती लढ्यात सहभाग होता.भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षानी गोवा मुक्त झाला तरी गोवा सर्वच क्षेत्रात विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.आरोग्यक्षेत्रात गोव्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यासाठी सर्व तरहेचे प्रयत्न सुरू केला आहे.जानेवारी महिन्यापासून नवी आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार असून त्याचा ९५ टक्के लोकांना फायदा होईल.
ओल्ड गोवा येथे शवप्रदर्शन सोहळ्याला सुमारे ३२ लाख लोकांनी उपस्थिती लावली सुमारे ६० लाख लोक शवप्रदर्शनाला उपस्थिती लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नुकत्याच गोव्यात झालेल्या आंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १३ हजार प्रतिनिधीनी नोंदणी करून उच्चांक गाठला होता. दोनापावला येथे आंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवा साठी कायम स्वरूपी इमारत उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रादेशीक आराखड्याचे काम सुरू झाले असून ज्यांनी प्रादेशिक आराखड्या संदर्भात ज्यानी विरोध केला होता त्यांचीही दखल घेतली जाणार आहे.रोजगार निर्मितीच्या बाबतीत सरकारचा विचार आहे.भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी खुप कष्ट घेण्याची गरज आहे.दुर्बल घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार संवेदनशिल आहे.राजकारण करावे परंतू त्यासाठी सर्वानी एकजुटीन कार्यकरण्याची गरज आहे.गोव्याने पर्यटन क्षेत्रात विकास केला आहे व्हिसा अरायव्हल मुळे पर्यटनाला त्याचा जास्त फायदा होईल.
यावेळी उत्कृष्ट संचलन केलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्याना बक्षिस देण्यात आले यात पहिले बक्षिस अवरलेडी ऑफ हेल्थ -कुंकळळ्ी, दुसरे बक्षिस सेंट जोजेफ हायस्कूल -वास्को. व तिसरे बक्षिस डॉन बॉस्को हायस्कूल-केपे यांना देण्यात आले तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे बक्षिस सेंट जोजेफ हायस्कूल-आके यांना देण्यात आले.(प्र्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-11,12
कॅप्शन: मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी.(छाया: अरविंद टेंगसे)
ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-14
कॅप्शन: मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो भाषण करताना..(छाया: अरविंद टेंगसे)
ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-15
कॅप्शन: राम मनोहर लोहिया याना पुष्पहार अर्पण करताना कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो .(छाया: अरविंद टेंगसे)
ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-16
कॅप्शन: मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरकारी कर्मचार्‍यांची उनुपस्थिती जाणवत होती .(छाया: अरविंद टेंगसे)



Web Title: The future of the country will be bright: if you look at the feeling of being a bright Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.