देशाचे भविष्य मुलींच्या हाती - नरेंद्र मोदी

By admin | Published: January 22, 2015 05:18 PM2015-01-22T17:18:06+5:302015-01-22T17:27:04+5:30

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना आवाहन करत मुलींचे जीवन वाचवण्यासाठी आज देशाचा पंतप्रधान तुमच्यासमोर भीक मागतोय असे भावनिक उद्गार त्यांनी काढले आहेत.

The future of our country - Narendra Modi | देशाचे भविष्य मुलींच्या हाती - नरेंद्र मोदी

देशाचे भविष्य मुलींच्या हाती - नरेंद्र मोदी

Next

ऑनलाइन लोकमत 

पानिपत, दि. २२ - स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना आवाहन करत मुलींचे जीवन वाचवण्यासाठी आज देशाचा पंतप्रधान तुमच्यासमोर भीक मागतोय असे भावनिक उदगार त्यांनी काढले आहेत.  मुलांच्या तुलनेत मुलीही कमी नसून  मुलीच देशाच्या भविष्य आहेत असेही त्यांनी सांगितले. 
हरियाणातील पानिपत येथे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत गुरुवारी शुभारंभ झाला. याप्रसंगी मोदींनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी देशवासियांना भावनिक शब्दात आवाहन केले. मोदी म्हणाले, मुलींशिवाय आपल्या समाजाचे अस्तित्वच नाही. क्रीडा, विज्ञान, शिक्षण, सेवा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मुलींची आगेकूच सुरु आहे.मात्र आपण अजूनही मुलींकडे जुन्या मानसिकतेनेच बघतो. हे आपल्या आजारी मानसिकतेचे लक्षण आहे असे त्यांनी नमुद केले. मुलींची घटती संख्या ही चिंताजनक असून मुली नसतील तर तुम्ही सून कशी आणणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  मुलांनी त्यांच्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेतली असती तर देशात वृद्धाश्रमांची संख्या का वाढतेय असा प्रश्न विचारत त्यांनी पुन्हा एकदा मुलींचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी मोदींनी सुकन्या समृद्धी खाते योजनेचा शुभारंभही केला. 

Web Title: The future of our country - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.