भावी पोलिसांची कडक उन्हात कसोटी! पोलीस भरती प्रक्रिया : पहिल्या दिवशी ३७९ पुरूष उमेदवारांची हजेरी
By admin | Published: March 30, 2016 12:24 AM2016-03-30T00:24:56+5:302016-03-30T00:24:56+5:30
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील ६२ जागांसाठी मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियोजनात पहिल्या दिवशी गडबड झाल्याने दुपारी ११ वाजेपर्यंत उमेदवारांची कडक उन्हात मैदानी चाचणी घेण्याची वेळ आली. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आपले भविष्य सुखकर होण्यासाठी अनेक तरुणांनी भर उन्हातही स्वत:ला झोकून देत मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड केली.
Next
ज गाव : जिल्हा पोलीस दलातील ६२ जागांसाठी मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियोजनात पहिल्या दिवशी गडबड झाल्याने दुपारी ११ वाजेपर्यंत उमेदवारांची कडक उन्हात मैदानी चाचणी घेण्याची वेळ आली. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आपले भविष्य सुखकर होण्यासाठी अनेक तरुणांनी भर उन्हातही स्वत:ला झोकून देत मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड केली.पोलीस दलातील ६२ जागांसाठी एकूण आठ हजार ७३२ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. त्यातून पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३८० उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. त्यातून एका उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याला पोलीस मैदानाच्या प्रवेशद्वारावरूनच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे ३७९ उमेदवारांना कागदपत्र तपासणी, शारीरिक व मैदानी चाचणीसाठी मैदानावर प्रवेश देण्यात आला.सुरुवातीला कागदपत्रांची तपासणीभरती प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे असणार्या उमेदवारांची लागलीच छाती व उंची मोजण्यात आली. शारीरिक चाचणीत पात्र ठरणार्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी मैदानावर सोडण्यात आले. त्याठिकाणी उमेदवारांची १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, पुलअप्स काढणे अशा स्वरुपाच्या चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येक टप्प्यातील सर्व उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी स्वतंत्ररित्या दुसर्या दिवशी सकाळी पोलीस मैदान क्रमांक दोनवर घेण्याचे ठरले आहे.भरती प्रक्रियेवर १२ सीसीटीव्हींची नजरभरती प्रक्रियेच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी १२ सीसीटीव्ही कॅमेरे (प्रत्येक कॅम्पवर एक) लावण्यात आलेले आहेत. या सर्व कॅमेर्यांच्या नियंत्रणासाठी पोलीस मैदानावर एक स्वतंत्र व्हीआयपी कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात स्वत: पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे हजर राहून मार्गदर्शन करतात.पारदर्शक प्रक्रियाभरती प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक चाचणीनंतर उमेदवाराने मिळवलेले गुण त्याच्या समक्ष यादीत लिहून त्यावर उमेदवाराची स्वाक्षरी घेतली जात आहे. उमेदवाराला काही शंका असल्यास त्याला अपील करण्याची मुभादेखील आहे. नियोजनाचे काम जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोनवणे पाहत आहेत.