दोन राज्यपालांचे भवितव्य अनिश्चित

By Admin | Published: September 10, 2016 03:32 AM2016-09-10T03:32:14+5:302016-09-10T03:32:14+5:30

अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची गच्छंती लांबणीवर पडली आहे;

The future of the two governors is uncertain | दोन राज्यपालांचे भवितव्य अनिश्चित

दोन राज्यपालांचे भवितव्य अनिश्चित

googlenewsNext

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची गच्छंती लांबणीवर पडली आहे; परंतु या दोघांना राज्यपालपदावरून हटविण्यामागचे कारण वेगवेगळे आहे. तथापि, माहीतगार सूत्रांनुसार जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाच्या शर्यतीत अनिल बैजल यांचे नाव आघाडीवर आहे.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना हटविण्याचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. बुधवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन राजखोवा यांना हटविण्यामागचा सरकारचा हेतू काय आहे, हे कळविले. अरुणाचलात राजकीय पेच निर्माण झाला तेव्हा राजखोवा यांनी हे प्रकरण हाताळताना घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन केले. यावरून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना चपराक दिली होती. असे असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या शिफारशी जशाच्या तशा मंजूर केल्या होत्या. असे काही महत्त्वाचे
मुद्दे राष्ट्रपतींनी उपस्थित केल्याचे समजते.
पंतप्रधानांनी काही प्रश्न उपस्थित केले तेव्हा राजखोवा यांनी दिशाभूल केली होती, असेही गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींना सांगितल्याचे समजते. यातून राज्यपाल आणि सरकारदरम्यान विश्वासाचा अभाव असल्याचे दाखविते. त्यांना हटविणे हाच एकमेव मार्ग आहे. आता राजखोवा यांना हटविण्यासाठी योग्य मार्ग शोधला जात असल्याचे कळते.
एन. एन. व्होरा यांना बदलणे किंवा हटविण्यासंदर्भातील स्थिती संवेदनशील, तसेच किचकट आहे. व्होरा हे अनुभवी नोकरशहा आहेत; परंतु त्यांचे वय ८० वर्षे आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे नवीन योजना नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर कायम ठेवण्यात आले. आता मात्र सरकारला त्यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करायची आहे. राज्यपाल म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी २०१३ मध्ये व्होरा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
व्होरांच्या जागी अनिल बैजल यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. वाजपेयी सरकारमध्ये ते गृहसचिव होते. व्होरा यांची बदली करावी की, हटवावे, अशी समस्या भेडसावत आहे. लष्करी किंवा गुप्तचर विभागाची पार्श्वभूमी नसलेले व्होरा जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषविणारी पहिली व्यक्ती आहे. १९९० मध्ये जगमोहन यांना हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी गिरीश चंद्र सक्सेना (‘रॉ’चे माजी प्रमुख),जन. के. व्ही. कृष्णराव आणि जन. एस. के. सिन्हा यांनी राज्यपालपद सांभाळले होते.
>एन.एन. व्होरा यांना बदलणे किचकट
एन. एन. व्होरा यांना बदलणे किंवा हटविण्यासंदर्भातील स्थिती संवेदनशील, तसेच किचकट आहे. व्होरा हे अनुभवी नोकरशहा आहेत; परंतु त्यांचे वय ८० वर्षे आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे नवीन योजना नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर कायम ठेवण्यात आले.

Web Title: The future of the two governors is uncertain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.