जी. मोहनकुमार नवे संरक्षण सचिव
By admin | Published: May 23, 2015 12:11 AM2015-05-23T00:11:59+5:302015-05-23T00:11:59+5:30
जी. मोहनकुमार यांची पुढील दोन वर्षांसाठी नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहनकुमार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले आर.के. माथुर यांचे स्थान घेतील.
नवी दिल्ली : संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव जी. मोहनकुमार यांची पुढील दोन वर्षांसाठी नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहनकुमार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेले आर.के. माथुर यांचे स्थान घेतील.
ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले जी. मोहनकुमार हेदेखील येत्या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होते; पण निवृत्तीच्या एक महिनाआधीच त्यांना संरक्षण सचिव बनविण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ, गुजरात आणि ओडिशा या राज्यांमधील आयएएस अधिकाऱ्यांना नियुक्तीमध्ये उच्च प्राधान्य देण्यात येत आहे. स्वत: मोदी हे गुजरातचे असल्यामुळे त्यांना गुजरात कॅडरमधील अधिकाऱ्यांची चांगली माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयात काम करणारे काही वरिष्ठ अधिकारीही गुजरात कॅडरमधूनच आलेले आहेत.