भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 02:42 PM2023-09-10T14:42:22+5:302023-09-10T14:43:58+5:30

G20 New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पुढील G-20 अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द केली.

G20 New Delhi: Concluding the G-20 summit in India, PM Modi gave a message of world peace | भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश

भारतातील G-20 शिखर परिषदेचा समारोप, PM मोदींनी दिला जागतिक शांततेचा संदेश

googlenewsNext

G20 New Delhi: राजधानी दिल्लीत आयोजित ऐतिहासिक G-20 शिखर परिषदेची सांगता करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी 'एक भविष्य' (One Future) या विषयावर चर्चा केल्यानंतर G20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी सर्व नेत्यांना पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून भेटण्याचे आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. समारोपाची घोषणा करताना पंतप्रधानांनी जागतिक शांततेचा संदेश दिला आणि 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की, नोव्हेंबरपर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसात तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी इथे मांडल्या, सूचना दिल्या, अनेक प्रस्ताव आले. त्या प्रस्तावांना गती कशी मिळेल, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबरच्या शेवटी G20 चे आणखी एक व्हर्च्युअल सत्र आयोजित करू आणि त्या सत्रात या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ.'

समारोपाची घोषणा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समारोपाची घोषणा केली आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पुढील G-20 अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द केली.  ‘योअर हायनेस, एक्सीलेंस यासोबतच मी G20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा करतो.  एक पृथ्वी, एक कुटुंब, वन भविष्याचा  आनंददायी असावा. स्वस्ति अस्तु विश्वस्य म्हणजे संपूर्ण जगात आशा आणि शांती असावी. 140 कोटी भारतीयांसाठी या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार,' असा संदेश मोदींनी यावेळी दिला.

Web Title: G20 New Delhi: Concluding the G-20 summit in India, PM Modi gave a message of world peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.