G20 बैठकीपूर्वीच PM मोदींनी पाकिस्तान-चीनचे आक्षेप फेटाळले, एका वाक्यात सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:43 PM2023-09-03T13:43:55+5:302023-09-03T13:45:51+5:30

मोदी म्हणाले, 2047पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल; भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिकतेला कसलंही स्थान नसेल...

G20 summit 2023 PM Narendra Modi interview says India will be a developed nation by 2047 corruption, casteism, communalism will have no place | G20 बैठकीपूर्वीच PM मोदींनी पाकिस्तान-चीनचे आक्षेप फेटाळले, एका वाक्यात सुनावलं!

G20 बैठकीपूर्वीच PM मोदींनी पाकिस्तान-चीनचे आक्षेप फेटाळले, एका वाक्यात सुनावलं!

googlenewsNext

भारताच्या जी-20 अध्यक्षतेचे अनेक सकारात्मक परिणाम आले आहेत. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोण, आता मानव-केंद्रित होताना दिसत आहे. यात भारत एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे. 'सबका साथ, सबका विकास' विश्व कल्याणासाठीही एक मार्गदर्शक सिद्धांत ठरू शकतो. तसेच, आपला देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे येणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 सम्मेलन होत आहे. यापूर्वी ते पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला कसल्याही प्रकारचे स्थान नसेल - 
पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल. जगाने जी-20 मध्ये आपले शब्द आणि दृष्टिकोण केवळ विचारांच्या स्वरुपातच नाही, तर भविष्यातील एक रोडमॅपच्या स्वरुपातही बघितले आहेत. भारताकडे प्रदीर्घकाळ एक अब्ज उपाशी पोट असलेला देश म्हणून बघितले जात होते. मात्र आता आपल्या देशाकडे एक अब्ज महत्वाकांक्षी डोकी आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश म्हणून पाहिले जात आहे.

पाकिस्तान आणि चीनचे आक्षेप फेटाळले -
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारती नागरिकांकडे विकासाची पायाभरणी करण्याची एक मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील. दहा वर्षांपेक्षाही कमी काळात पाच स्थानांनी झेप घेण्याच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, याणाऱ्या काळात भारत जगातील जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात जी-20 च्या बैठका आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावत भारताच्या प्रत्येक भागात बैठक आयोजित होणे 'स्वाभाविक' आहे, असे म्हटले आहे. 

Web Title: G20 summit 2023 PM Narendra Modi interview says India will be a developed nation by 2047 corruption, casteism, communalism will have no place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.