जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:58 AM2023-09-09T05:58:42+5:302023-09-09T05:58:50+5:30

‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे.

G20 summit from today; Many agreements will be held in Delhi in two days | जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार

जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर भारताचे वाढते सामर्थ्य अधाेरेखित करणाऱ्या दाेन दिवसीय ‘जी२०’ शिखर संमेलनाला शनिवार ९ सप्टेंबरपासून सुरूवात हाेत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयाेजन हाेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. 

‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. ती भारतीय संस्कृतीवर आधारित ही असून जगभरातील अनेक समस्यांवर भारत ताेडगा देऊ शकताे.  जगभरातील नेत्यांसाेबत सार्थक चर्चेची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘एक्स’वर माहिती दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे परिषदेत सहभागी हाेणार नाहीत.

हे नेते झाले दाखल
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलाेनी,  जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा जर्मनीचे चान्सलर ओलाफ शाेज्झ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राेन,, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टाे फर्नांडिज, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफाेस  इत्यादी राजधानीत दाखल झाले आहेत. हे नेते जगातील विविध प्रश्नांवर पुढील दाेन दिवस विचारमंथन करणार आहेत.

जगाच्या हितासाठी भारत-अमेरिका मैत्री...
मुक्त आणि सर्वसमावेशक भारत-प्रशांत भागासाठी ‘क्वाड’चे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी अधाेरेखित केले. दाेन्ही देशांची मैत्री जगाच्या हितासाठी माेठी भूमिका पार पाडेल, असा विश्वास पंतप्रधान माेदींनी व्यक्त केला. जी२० संमेलनात सहभागी हाेण्यासाठी बायडेन हे भारतात दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. माेदी आणि बायडेन यांच्यातील चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

माेदी-बायडेन चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

  • दाेन्ही देश स्वातंत्र्य, लाेकशाही, मानवाधिकार व इतर प्रश्नांप्रती कटीबद्ध राहणार
  • २०२४मध्ये भारतात ‘क्वाड’ बैठकीचे आयाेजन करून भारत-प्रशांत भागात क्वाडचे महत्त्व वाढविणे.
  • संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी अमेरिकेचा पाठिंबा.
  • इस्राे आणि नासा यांच्यात सहकार्याने तंत्रज्ञानाची भागीदारी वाढविणे.
  • ५जी, ६जी, रेडिओ ॲक्सेस नेटवर्क (रॅन) आणि दूरसंचार क्षेत्रात एकमेकांच्या सहयाेग वाढविणे.
  • सशााेधन क्षेत्रात सहकार्य आणि भागीदारी.
  • दाेन्ही देशांमध्ये महत्त्वाची संरक्षण क्षेत्रातील भागीदारी घट्ट करणे.
  • विमानांचे इंजिन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी सहयाेग.
  • अत्याधुनिक एमक्यू-९बी ड्राेन विमान भारताला देणे.
  • अणुउर्जा क्षेत्रात भारतासाेबत सहयाेग आणि एनएसजी गटाच्या सदस्यत्वासाठी पुढाकार.
  • जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित वादविवाद मिळविणे.
  • कर्कराेग उपचार, संशाेधन, प्रतिबंध आणि आराेग्य क्षेत्रात सहकार्य वाढविणे.

Web Title: G20 summit from today; Many agreements will be held in Delhi in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.