गडकरी-राहुल यांच्यात कलगीतुरा! ‘धाडसा’च्या अनाहूत कौतुकावरून टि्वटकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:32 AM2019-02-05T06:32:49+5:302019-02-05T08:55:06+5:30
‘भाजपामध्ये नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून उपरोधिक कौतुक करण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
नवी दिल्ली : ‘भाजपामध्ये नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून उपरोधिक कौतुक करण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
‘जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार?, असे विधान गडकरी यांनी शनिवारी रात्री नागपूरमध्ये अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले. त्यावरून राहुल गांधी व गडकरी यांनी परस्परांवर टिष्ट्वटकार केले. हे करत असतानाच गडकरी यांनी माध्यमांनी आपले वक्तव्य विकृत स्वरूपात प्रसिद्ध केल्याचेही ध्वनित केले.
गडकरी यांनी हे कथित विधान पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केल्याचे गृहित धरून राहुल गांधी यांनी केलेल्या टिष्ट्वटने याची सुरुवात झाली. त्यात राहुल गांधी यांनी लिहिले, ‘ गडकरीजी, अभिनंदन! भाजपामध्ये थोडे बहुत धाडस असलेले तुम्ही एकटेच आहात. जरा या विषयांवरही बोला. १. राफेल घोटाळा व अनिल अंबानी, २. शेतकऱ्यांची हालाखी, ३. लोकशाही संस्थांचे खच्चीखरण.’
याला उत्तर देताना गडकरी यांनी लिहिले, ‘राहुल गांधीजी माझ्या धाडसाबद्दल मला तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही. पण एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही आमच्या पक्षावर हल्ला चढविण्यासाठी तुम्हाला माध्यमांनी दिलेल्या विकृत वृत्तावर अवलंबून राहावे लागावे, याचे आश्चर्य वाटते.’
पुढच्या टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी यांना उद्देशून गडकरी यांनी लिहिले, ‘ मी काही विषयांवर बोलावे असे तुम्ही सुचविले आहे. त्यापैकी राफेलविषयी मी असे सांगेन की, देशाच्या हिताला अग्रक्रम देऊनच आमच्या सरकारने हा करार केला. तुमच्या सरकारच्या धोरणांनी शेतकºयांना संकटात टाकले, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम मोदीजी करत आहेत.’ मोदींच्या प्रामाणिकपणाने विरोधक हताश झाले आहेत, असा टोला लगावत गडकरी यांनी भविष्यात राहुल गांधी अधिक तर्क संगत व जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. गडकरी यांच्या उत्तरानंतरही राहुल गांधी गप्प बसले नाहीत. सकाळच्या आपल्या पहिल्या टिष्ट्वटमध्ये बेरोजगारीचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.