गडकरींनी पुलाचे भूमीपुजन करताच ३ वर्ष राखलेली दाढी काढली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 07:53 PM2016-01-12T19:53:37+5:302016-01-12T19:53:37+5:30

पुल तयार व्हावा म्हणून गेल्या ३ वर्षापासून वाढवलेली दाढी आज केंद्रीय वाहतूक मंत्री नीतीन गडकरग यांनी पुलाचे भूमीपुजन केल्यावर दाढीचे मुंढन केले.

Gadkari took the beard of 3 years after the bridge was done. | गडकरींनी पुलाचे भूमीपुजन करताच ३ वर्ष राखलेली दाढी काढली..

गडकरींनी पुलाचे भूमीपुजन करताच ३ वर्ष राखलेली दाढी काढली..

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - पुल तयार व्हावा म्हणून गेल्या ३ वर्षापासून वाढवलेली दाढी आज केंद्रीय वाहतूक मंत्री नीतीन गडकरग यांनी पुलाचे भूमीपुजन केल्यावर दाढीचे मुंढन केले. पुलाचे काम व्हावे म्हणून ३७ वर्षीय व्यक्तीने अजब रीत्या निषेध केला होता. महेश वरीक असे त्या माणसाचे नाव असू मागील ३ वर्षात त्याची दाढी पोटापर्यंत वाढली होती. 
गोवामधील पणजी जवळ काणकोण भागातील दोन नद्यांना जोडणारा पूल बांधला जाण्याची गरज होती म्हणून तीन वर्षे दाढी वाढवून आंदोलन केल्यानंतर दाढी मुंडन करण्यासाठी त्याने स्थानिक न्हाव्याकडे गेला असता ही बाब उघड झाली. 
२०१२ मध्ये गोव्यात भाजपाची सत्ता आली त्यावेळी आपल्या परीसरात पुल बनावा म्हणून दाढी वाढवली होती. आज ३ वर्षानंतर पुलाचे काम सुरु होणार असे दिसताच जसे आपण देवाला बोललं नवस पुर्ण करतो तस त्याने आपले नवस पुर्ण झाल्याप्रमाणे दाढी केली. 
 
 

Web Title: Gadkari took the beard of 3 years after the bridge was done.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.