हे असतील भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नावांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:44 PM2024-02-27T13:44:04+5:302024-02-27T15:28:04+5:30
Gaganyaan mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि भारताच्या गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये इस्रोच्या तीन प्रमुख तांत्रिक विभागांचं उद्घाटन केले. यावेळी मोदींनी तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई आंतराळ केंद्राचा दौरा केला. यावेळी मोदींनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गगनयान मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांची भेट घेतली. त्यानंरत इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील अंतराळवीरांची नावंही समोर आली आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर आहेत.
यावेळी मोदींनी ही वेळही आपलीच आहे. आजची पिढी भाग्यवान आहे, असं विधान केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिएसएससीमधील ट्राइयोसोनिक विंड टनेल, तामिळनाडूतील महेंद्रगिरीमधील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील सेमी क्रायोजेनिक इंटीग्रेटेड इंजिनासंबंधी विभाग आणि सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रामधील पीएसएललव्ही एकीकरण विभागाचं उद्घाटन केलं.