गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:15+5:302015-02-11T00:33:15+5:30

नागपूर : श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शहरातील विविध गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.

Gajananan Maharaj distinguished program for the celebration of the day | गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Next
गपूर : श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शहरातील विविध गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.

रेंघेनगर गजानन महाराज मंदिर
तलमले इस्टेट, रेंघेनगर, त्रिमूर्ती नगरातील संत श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये महेश्वरी देवी यांचे प्रवचन व संकीर्तन होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध भजन मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे. प्रगटदिनाच्या निमित्ताने श्रींचा अभिषेक होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा निघेल. पालखी सोहळ्यात ७५० भजनी मंडळ सहभागी होणार आहे. पालखीत विविध सामाजिक विषयावर देखाव्यांचा समावेश आहे. १२ फेब्रुवारीला मंदिराच्या परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
लाकडीपूल गजानन महाराज मंदिर
लाकडीपूल येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रगट दिन उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय या उत्सवात पूजा, अभिषेक, आरती, गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, महिला भजन मंडळाद्वारे भजनांचा कार्यक्रम होणार आहे. ११ फेब्रुवारीला नगरसेवक राजेश घोडपागे व नगरसेविका वंदना इंगोले यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण होणार आहे. १३ फेब्रुवारीला स्वरवेदद्वारे स्वर पुष्पांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होईल.

चिखली लेआऊट संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रम
श्री संत गजानन महाराजांच्या १३७ व्या प्रगटदिनोत्सवानिमित्त नवीन सुभेदार येथील चिखली लेआऊटच्या श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रमात शिवपुराण संगीतमय कथा सप्ताह नामसंकीर्तन सोहळा ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. कथा सप्ताहात गुरुवर्य अनिल अहेर महाराज उद्बोधन करणार आहे. महाराजांच्या प्रगटदिनाच्या दिवशी पालखीचे दिंडीसह भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. सप्ताहाच्या समारोपाला हभप प्रा. शांताराम ढोले महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन होईल.

तीनखंबा चौक, टिमकी संत गजानन महाराज सेवा समिती
येथे ४ फेब्रुवारीपासून प्रगटदिन उत्सवाला सुरुवात झाली आहे. १३ फेब्रुवारीला उत्सवाचे समापन होणार आहे. यादरम्यान भजन, सत्संग आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समापनाच्या दिवशी भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे.

Web Title: Gajananan Maharaj distinguished program for the celebration of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.