ॅंएफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार

By admin | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:45+5:302016-01-06T01:51:45+5:30

पुणे : एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी 139 दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या निषेधार्थ रंगविण्यात आलेल्या भिंती स्वच्छ करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून, प्रवेशद्वारावर उभी राहिलेली कलाकृतीदेखील हटविण्यात आली आहे.

Gajendra Chauhan will come tomorrow in the FFII | ॅंएफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार

ॅंएफटीआयआयमध्ये उद्या गजेंद्र चौहान येणार

Next
णे : एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी 139 दिवस संप केला. त्याच चौहान यांचा गुरुवारी एफटीआयआयमध्ये दिमाखात प्रवेश होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या निषेधार्थ रंगविण्यात आलेल्या भिंती स्वच्छ करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून, प्रवेशद्वारावर उभी राहिलेली कलाकृतीदेखील हटविण्यात आली आहे.
चौहान यांच्या नियुक्तीसह इतर सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. मात्र चर्चेच्या गुर्‍हाळात पिसल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर दोन महिन्यांपूर्वी संप मागे घेण्याची वेळ आली. तरीही चौहान यांना संस्थेत प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी भूमिका देखील विद्यार्थ्यांनी जाहीर केली होती. पण विद्यार्थ्यांचा विरोध झुगारत चौहान नियामक मंडळासह उद्या संस्थेत ‘एन्ट्री’ करीत आहेत.
संस्थेत गुरुवारी नियामक मंडळाची पहिली बैठक होत आहे. संप मागे घेतल्यानंतर 18 डिसेंबर रोजी बैठक ठरविण्यात आली होती. मात्र संसदेच्या अधिवेशनामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. ती अखेर उद्या होणार असून संस्थेत दिवसभर विविध प्रश्नांवर मंथन होणार आहे.
--------------------------------------------------------
‘गजेंद्र चौहान यांचे बुधवारी सायंकाळी आगमन होणार असून, ते बैठकीसाठी गुरुवारी संस्थेत येतील. दिवसभर चालणार्‍या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र त्यांची विद्यार्थ्यांबरोबर बैठक अद्याप ठरलेली नाही.’
- प्रशांत पाठराबे,
संचालक, एफटीआयआय.
----------------------------

Web Title: Gajendra Chauhan will come tomorrow in the FFII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.