दोन हॉटेल्सवर गजराज

By admin | Published: October 14, 2016 12:54 AM2016-10-14T00:54:13+5:302016-10-14T00:54:13+5:30

व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या तीन लब्धप्रतिष्ठितांवर गुरुवारी कारवाईचा दंडुका उगारण्यात आला.

Gajraj at two hotels | दोन हॉटेल्सवर गजराज

दोन हॉटेल्सवर गजराज

Next

कारवाईला सुरुवात : अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले
अमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या तीन लब्धप्रतिष्ठितांवर गुरुवारी कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. बडनेरा मार्गावरील हॉटेल सेव्हन पीएम, हॉटेल लजीज आणि श्री ट्रेडिंग कंपनीने पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आले. गुरूवारपासून म्हणजे १३ आॅक्टोबरपासून सुरू झालेली ही मोहीम २२ संकुलधारकांवरील कारवाई पूर्ण होईपर्यंत अव्याहत सुरू राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.
ज्या २२ संकुलांमधील पार्किंगच्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले त्यात हमालपुरा झोनमधील ६, बडनेरा झोनमधील ५ आणि भाजीबाजार झोनमधील ११ संकुलांचा समावेश आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी सहायक संचालक नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुखांना पार्किंगच्या ठिकाणी केलेल्या अनधिकृत बांधकामावर गजराज फिरविण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुरूवारी सकाळी १० वाजता गणेश कुत्तरमारे पथकासह पोहोचले व कारवाईला सुरूवात झाली. यादरम्यान काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करून महापालिकेच्या या कारवाईला विरोध केला.

शुक्रवारीही होणार कारवाई
अमरावती : विरोधाला न जुमानता बडनेरा मार्गावरील हॉटेल सेव्हन पीएम, हॉटेल लजीज आणि श्री ट्रेडिंग कंपनीचे अतिक्रमण महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले.
हॉटेल सेव्हन पीएममध्ये तब्बल ३ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम करून पार्किंगची जागा हडपण्यात आली होती. कारवाईदरम्यान शौचालय, बाथरुम आणि गोदाम तोडण्यात आले. बडनेरा मार्गावरील श्री ट्रेडिंग कंपनीने पार्किंगच्या जागेवरील सुमारे ४०० चौरस फुट अवैध बांधकाम करून अतिक्रमण केले होते. त्यावर महापालिकेने गजराज फिरविला आहे. याशिवाय लजीज हॉटेलवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारीदेखील ही कारवाई केली जाणार आहे. कारवाईत बडनेरा झोनचे सहायक अभियंता नितीन बोबडे, नितीन भटकर, प्रवीण इंगोले, उमेश सवाई, पीएसआय विजय चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी महापालिकेचा गजराज चालविला जाणार आहे.

Web Title: Gajraj at two hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.