जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 02:05 PM2023-12-19T14:05:21+5:302023-12-19T14:12:36+5:30

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात गलवानमध्ये झालेल्या चीन सैन्यासोबतच्या तणावाचा उल्लेख केला आहे.

galwan ghati china conflict general mm narvane book four stars of destiny describe incident rajnath singh phone call | जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारत आणि चीन सैन्यात मोठी चकमक झाली होती. ही ४० वर्षांतील सर्वात प्राणघातक चकमक मानली जाते. यावरुन देशात आरोप-प्रत्यारोपही झाले होते, यावर आता तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी मोठा खुलासा केला आहे. 

तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवर चिनी सैन्याने रणगाडे घेऊन पुढे जाण्यास सुरुवात केली होती. गलवान खोऱ्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने भारतीय लष्कराला फ्री हॅन्ड दिला होता, आणि जे योग्य असेल ते करण्याचे आदेश दिले होते. जनरल एम एम नरवणे यांनी या परिस्थितीचा कसा सामना केला हे त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

निवृत्त लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आत्मचरित्रात ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्रीचा उल्लेख केला आहे. नरवणेंसाठी ती रात्र सोपी नव्हती, त्या रात्री त्यांना संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण कर्मचारी यांचे सतत फोन येत होते, यामुळे त्यांच्या अडचणी आणखी काही वाढल्या.

नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, "त्या रात्री मी पहिल्यांदा संरक्षणमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास मला फोन आला. संरक्षणमंत्र्यांनी मला फोन केला. म्हणाले, मी पंतप्रधानांशी बोललो आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे त्यांनी सांगितले. हा लष्करी निर्णय होता.

आपल्या आत्मचरित्रात पुढे माजी लष्करप्रमुख  म्हणाले, "मला अतिशय नाजूक परिस्थितीत टाकण्यात आले होते, जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती. मी खोलीत काही वेळ फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू शकलो आणि मी शांतपणे बसलो. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले.

सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिल्यानंतर त्यांनी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांना फोन केला" मी त्यांना फोन केला आणि आमच्या बाजूने पहिला गोळीबार होऊ शकत नाही, कारण यामुळे चिनी सैन्याला एक निमित्त मिळेल आणि ते पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होतील.", असं त्यांना सांगितलं.

भारतीय लष्कर स्वतः कैलास पर्वतरांगांवर मजबूत स्थितीत

नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, चिनी लष्कराने २९-३० ऑगस्टच्या रात्री मोल्डो येथून पॅंगॉन्ग त्सो येथील चुनती चांगला भागात आपले सैन्य पाठवले होते. तथापि, ३० तारखेच्या सकाळपर्यंत भारतीय लष्कर स्वतः कैलास पर्वतरांगांवर अतिशय मजबूत स्थितीत होते.

चीनी सैन्याचे स्थान खूप कमी उंचीवर होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकलो. "सध्या त्यांचा आमच्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, परंतु जर ते मोठ्या लष्करी क्षमतेसह आले असते, तर आमच्यासाठी नवीन आव्हान उभे राहू शकले असते." ३१ ऑगस्ट रोजी चीनच्या बाजूने बरीच हालचाल दिसली होती, पण भारतीय सैन्याने आपली स्थिती बरीच मजबूत केली होती, असंही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचे सतत फोन

माजी लष्करप्रमुखांनी लिहिले की, "पुन्हा एकदा नॉर्दर्न कमांडच्या आर्मी चीफचा फोन आला. त्यांनी माहिती दिली की चिनी रणगाडे पुढे सरसावत आहेत आणि माथ्यापासून फक्त एक किलोमीटर दूर आहेत. मी पुन्हा संरक्षणमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना विचारले की काय करावे?"

नरवणे म्हणाले की, त्यांनी पुन्हा एकदा संरक्षण मंत्री आणि NSA अजित डोवाल यांना रात्री १० वाजता फोन केला आणि कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर मला लगेच कमांडर जोशी यांचा फोन आला. टँक पुढे सरकल्या असून आता फक्त ५०० मीटर अंतर उरल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जोशी यांनी नरवणे यांना सांगितले की चीनच्या सैन्याला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मध्यम तोफखाना उघडणे, ज्यासाठी फक्त आदेशांची प्रतीक्षा आहे. पुढे त्यांच्या पुस्तकात माजी लष्करप्रमुखांनी चीनच्या सैन्याला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती पावले उचलली आणि कोणत्या प्रकारची कारवाई केली हे सांगितले.

Web Title: galwan ghati china conflict general mm narvane book four stars of destiny describe incident rajnath singh phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.