Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:41 PM2021-05-23T22:41:36+5:302021-05-23T22:42:24+5:30

Galwan Valley Clash in Early May: मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये गलवान खोऱ्यात अशी कोणतीही घटना घडली नाही. लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेला बाधित करण्याचा प्रयत्न आहे, असे लष्कराने म्हटले आहे.

Galwan Valley Clash: Minor face-off with Chinese troops in Galwan Valley? Indian Army said no | Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले

Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले

googlenewsNext

Galwan Valley Clash again: काही वेळापूर्वी गलवान खोऱ्यात पुन्हा एकदा भारत-चीन सैन्यादरम्यान (India-china conflict) संघर्ष झाल्याचे वृत्त आले होते. यामुळे गेल्य़ा वर्षीच्या रक्तरंजित हिंसेची आठवण झाली होती. मात्र, हे वृत्त भारतीय सैन्य़ाने फेटाळले आहे. भारतीय सैन्य़ दलाने सांगितले की, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला नाहीय. प्रसारमाध्यमांनी कोणतीही बातमी देवू नये, जोपर्य़ंत सैन्य़ाच्या कोणत्याही अधिकृत सुत्रांनी त्यांना माहिती दिलेली नसेल. (No new any clash took place in Galwan Valley in early May: Indian Army)


द हिंदूने काही वेळापूर्वीच सुत्रांच्या हवाल्याने गलवान घाटीत दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त दिले होते. आधीच्या घटने एवढा मोठा संघर्ष नसला तरीदेखील कमी तीव्रतेचा संघर्ष झाल्याचे यामध्ये म्हटले होते. द हिंदूच्या या वृत्तावर भारतीय सैन्याने आपत्ती दर्शविली आहे. 23 मे रोजी छापून आलेल्या या वृत्तात गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत सामान्य टक्कर यावर जास्त लक्ष दिले गेले असे म्हटले आहे. (Indian Army on Sunday dismissed reports of any kind of face-off taking place in the Galwan Valley between the Army and China's People Liberation Army (PLA) in early May.)


मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये गलवान खोऱ्यात अशी कोणतीही घटना घडली नाही. लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेला बाधित करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय सैन्याशी संबंधीत कोणतेही वृत्त अधिकृत सुत्रांकडून नक्की होत नाही तोवर प्रसारमाध्यमांनी तिऱ्हाईताच्या आधारे देऊ नये, असे लष्कराने म्हटले आहे. 

Web Title: Galwan Valley Clash: Minor face-off with Chinese troops in Galwan Valley? Indian Army said no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.