India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:02 PM2020-06-16T14:02:57+5:302020-06-16T14:39:01+5:30

कितीही तणावाची परिस्थिती असली तरीही सीमेवर गोळीबार किंवा कोणतीही अनुचित घटना न घडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनची स्तुती केली होती.

Galwan Valley Jawan martyred on Indo-China border for the first time since 1967 | India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

India China Faceoff 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

Next

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवरील वाद चिघळला असून आज एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. ही घटना धक्कादायक आहे. कारण 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर आपला जवान शहीद झाला आहे. गेल्या 4 दशकांपासून एलएसीवर असलेली शांतता काल रात्री भंग पावली आहे. 


चीनच्या सैन्याकडून झालेल्या हिंसक हल्ल्यात भारताने एक अधिकारी आणि दोन जवान गमावले आहेत. असे 70 च्या दशकानंतर पहिल्यांदाच झाले आहे. एलएसी सीमेवर शेवटची गोळी 1967 मध्ये झाडली गेली होती. यावेळीही गोळी झाडली गेली नाही पण जवान शहीद झाले आहेत. 


कितीही तणावाची परिस्थिती असली तरीही सीमेवर गोळीबार किंवा कोणतीही अनुचित घटना न घडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनची स्तुती केली होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, चीनच्या सीमेवर एकही गोळी चालली नाही, हे दोन्ही देशांमधील परिपक्वतेचे लक्षण आहे. 
कोरोना व्हायरसमुळे जगभरात टीका आणि विरोधाचा सामना करावा लागत असल्याने चीन तणावात आहे. यामुळे चीनमधील उत्पादनांची मागणीही घटलेली आहे. यामुळे चीनच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादाची लाट आणण्यासाठी आणि लोकांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी चीन भारत आणि तैवानसोबत तणाव वाढवू लागला आहे. यामुळे चीनने भारताच्या लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. एकदा दोन्ही सैन्यादरम्यान दगडफेकही झाली आहे. 


1967 मध्येही झालेला हिंसक हल्ला
भारत आणि चीनमध्ये शेवटचा गोळीबार 1967 मध्ये झाला होता. म्हणजे 53 वर्षांपूर्वी. ही हिंसा सिक्किममध्ये झाली होती. चीन अशासाठी चिडला होता कारण भारत आपल्या क्षेत्रामध्ये 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. 1967 च्या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Big Breaking भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

Web Title: Galwan Valley Jawan martyred on Indo-China border for the first time since 1967

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.