लपाछपी ठरली जीवघेणी; पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:32 PM2018-12-22T12:32:06+5:302018-12-22T12:46:33+5:30

लपाछपीसारख्या खेळामुळे एका कुटुंबामध्ये भयानक घटना घडली आहे. हा खेळ खेळत असताना दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

game of hide and seek turns fatal for family in coimbatore tamil nadu ends in death of boy | लपाछपी ठरली जीवघेणी; पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्या

लपाछपी ठरली जीवघेणी; पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देलपाछपी खेळादरम्यान घडली भयानक दुर्घटना पाण्याच्या टाकीत बुडून 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्यावडिलांना पंख्याला गळफास घेऊन संपवलं आयुष्य

कोईम्बतूर - लपाछपीसारख्या खेळामुळे एका कुटुंबामध्ये भयानक घटना घडली आहे. हा खेळ खेळत असताना दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकल्यानं त्याच्या वडिलांनाही आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील ही घटना आहे. मनिकंदन (वय 32 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मनिकंदन हे घरामध्ये मुलगी देवदर्शिनी (वय 5 वर्ष)सोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. यावेळेस त्यांचा मुलगा देजश्विन(वय 2 वर्ष) घरामध्येच खेळत होता.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीसोबत खेळताना मनिकंदन यांना लक्षात आले की त्यांचा मुलगा गायब झाला आहे. यानंतर त्यांनी तातडीनं मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्यांना देजश्विन उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडालेला दिसला. 
मनिकंदन यांना मुलाच्या मृत्युचा जबरदस्त धक्का बसला. यावेळेस त्यांनी आपल्या मुलीला आवाज न करता खेळ सुरू ठेवण्यास सांगितले. स्वतः लपत असल्याचं सांगत त्यांनी मुलीला शोधायला सांगितले. यानंतर मनिकंदन एका खोलीत जाऊन लपले, पण तेथून ते बाहेर आलेच नाहीत. बराच प्रयत्न करुन बाबा सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीनं आईकडे धाव घेतली.  

6 वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
मनिकंदन यांच्या पत्नीनंही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर त्यांनी खोलीची खिडकीतून उघडली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, मनिकंदन यांनी पंख्याला गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. 
आरडाओरडा करत त्यांच्या पत्नीनं शेजाऱ्यांना बोलावलं. यानंतर मुलाचा शोध घेतला असता त्यांचं दोन वर्षांचं बाळ पाण्याच्या टाकीत बुडालेलं दिसलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झाले होते. मुलाच्या मृत्युचा धक्का पचवू न शकल्यानं मनिकंदनही यांनीही आत्महत्या केली. दरम्यान,वडील-मुलगा दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. 
 

Web Title: game of hide and seek turns fatal for family in coimbatore tamil nadu ends in death of boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.